Coronavirus : कोरोनाबाबत मुंबईतून आली गुडन्यूज; एकही नवा रुग्ण सापडला नाही

Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली असून जवळपास चार महिन्यानंतर मुंबईतून शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Jun 20, 2023, 05:47 PM IST
Coronavirus : कोरोनाबाबत मुंबईतून आली गुडन्यूज; एकही नवा रुग्ण सापडला नाही title=
Mumbai Corona cases

Mumbai Corona cases  : देशासह राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (corona vaccination) आकडेवारी यामागील कारण आहे. याचदरम्यान मुंबईतून (mumbai corona) कोरोनासंदर्भात चांगली बातमी आली असून जवळपास चार महिन्यानंतर मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांची शून्याने नोंद झाली आहे. फेब्रुवारीनंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा हा आकडा समोर आला असून कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईमध्ये सोमवारी (19 जून) एकही कोरोना (कोविड – 19) बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईकरांसाठीही एक दिलासादायक बातमी असून मुंबईमध्ये फक्त 26 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 1163913 कोरोना (कोविड – १९) रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 19773 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 114104 रुग्णांनी या भयंकर महामारीवर मात केली आहे.

तर रविवारी 1 हजार 715 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त आहेत. तर एकेकाळी कोरोनाचा हॉस्पॉट ठरलेल्या धारावीत केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे की मुंबईच्या कोरोना लढ्याचे कौतुक केलं. मुंबई गेल्या 24 तास 367 नवे रुग्ण उपचारांत आले. तर 418 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरं होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले. यासोबतच पॉझिटिव्हिटी दर 1.27 टक्क्यांवर आला. विशेष म्हणजे 10 ते 16 ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हिटी दर खाली 0.06 टक्के तुम्ही नोंदवली आहे. शहरात सध्या 5030 सक्रीय रुग्ण आहेत. 

दरम्यान मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना बाधित रुग्णात झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईत कोरोनाचा शिरकाव बाधित रुग्णांची संख्या 21 हजार रुग्णांची होती. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा उसळल्या असून ओमायक्राॅन बीएफ 7,बीबी, एक्सबी 1.5 असे नवनवीन व्हेरिएंटचा शिरकाव मुंबईत झाला. 

तसेच मुंबई महानगरपालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबईच्या 24 वॉर्ड लोकसभा निवडक केंद्रांवर भारत बायटेकची इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) नाकवाटे दिली जाणारी लस उपलब्ध आहे. मुंबई महानगरपालिका या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. 24 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. नोंदणी जागेवरच होईल लसीकरण केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुई शिवाय) दिली जाणारी पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला इंट्रा-नॅल कोविड लस म्हटले जाते.