कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डसंदर्भात नवा दावा!

कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या 558 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली.

Updated: Dec 20, 2021, 12:06 PM IST
कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डसंदर्भात नवा दावा!  title=

पुणे : कोरोना लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज किती वेळ राहतात असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर आता कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 3-7 महिन्यांनंतरही 500 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज आढळून आल्याचं समोर आलं आहे. 

कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये 90 टक्के अँटीबॉडीज आढळल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 7 महिन्यांपर्यंत 90 टक्के अँटीबॉडीज असतात असा दावा पुण्याच्या बीजे सरकारी महाविद्यालयं आणि ससून रुग्णालयाच्या अहवालात समोर आला आहे.

कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या 558 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या चाचण्यांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पुण्यातील ससून रूग्णालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, एकूण लोकसंख्येपैकी अजून बहुतांश लोकांनी अजून कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थिती बूस्टर डोस देणं योग्य होणार नाही.

कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर 3 महिन्यांनंतर 96.77 टक्के अँटीबॉडीज आढळल्या. तर 7 महिन्यांनंतर 91.89 टक्के अँटीबॉडीज असल्याचं दिसून आलंय. इतकंच नव्हे तर दिल्लीमध्ये झालेल्या सीरो सर्व्हेमधून 90 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या.

दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट जगातल्या 89 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट पोहोचला आहे. तीन दिवसांत रूग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे असा इशारा WHO ने दिलाय. 

यावेळी कम्युनिटी ट्रान्समिशनची दाट शक्यता असलेल्या ठिकाणी अशा ठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत वेगानं पसरण्याची अधिक शक्यता आहे असं WHO ने म्हटलंय. तर ओमायक्रॉनमुळे ब्रिटन आणि अमेरिकेत परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे.