आता लसीचा एकच डोस कोरोना, डायबेटीज आणि टीबीपासून वाचवणार?

भारतात कोरोना व्हायरसवर चालू असलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, काही काळानंतर कोरोनाच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे

Updated: Jul 20, 2022, 06:21 AM IST
आता लसीचा एकच डोस कोरोना, डायबेटीज आणि टीबीपासून वाचवणार? title=

मुंबई : देशात आता नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येतोय. भारतात कोरोना व्हायरसवर चालू असलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, काही काळानंतर कोरोनाच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे, जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा वृद्ध आहेत. 

भारतीय शास्त्रज्ञ आता बीसीजी लस मधुमेह आणि कोरोना व्हायरसपासून संरक्षण देऊ शकतात का यावर संशोधन करत आहेत. हे संशोधन ICMR द्वारे केलं जातंय. खरं तर, या संशोधनाचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्यांच्या घरी टीबीचा रुग्ण आहे, अशा लोकांना बीसीजीचा बूस्टर डोस देऊन टीबीपासून वाचवता येईल का. पण संशोधनातून असंही समोर आलंय आहे की, ही लस मधुमेहापासूनही संरक्षण देऊ शकते.

भारतात होत असलेल्या या संशोधनात नवजात बालकांना रोगप्रतिकारशक्ती देणारी ही लस मधुमेहाबरोबरच करोनापासूनही संरक्षण देत आहे का, याचंही संशोधन केलं जाणार आहे. असं झाल्यास ही बीसीजी लस अनेक आजारांवर औषध ठरू शकते. 

आतापर्यंत भारतातील लोकांना ही लस नवजात बालकांच्या लसीकरणासाठी आवश्यक असलेली लस म्हणून माहीत आहे, परंतु लवकरच या लसीचं महत्त्व आणि ओळख दोन्ही बदलू शकतात. या संशोधनात टीबीच्या रुग्णांच्या संपर्कात आलेली 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांचा समावेश केला जाणार आहे.

ICMR ने मुलांवर संशोधन केलं सुरू

मुलांना बीसीजी लसीचा बूस्टर डोस दिला जाईल आणि परिणामांचा अभ्यास केला जाईल. बीसीजी लसीचा बूस्टर डोस एखाद्याला टीबीच्या संपर्कात असूनही टीबी होण्यापासून वाचवू शकतो की नाही याचं संशोधन हे मूल्यांकन करेल. ज्यांच्या घरात टीबीचे रुग्ण आहेत अशा 9 हजार मुलांवर हे संशोधन केले जाणार आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये अभ्यास सुरू होण्याची शक्यता आहे.

बीसीजी लस बाळाच्या जन्मापासून ते एक वर्षापूर्वी दिली जाते. ही लस भारतातील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा एक भाग आहे. ही लस प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करते आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून, विशेषतः टीबीपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी मानली जाते.