Pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय? महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही हे फळ

पुरुषांसाठीही डाळिंब फायदेशीर आहे हे नाकारता येणार नाही, पण महिलांच्या अनेक समस्या डाळिंबामुळे दुर होताता हे देखील तेवढंच खरं आहे.

Updated: Mar 30, 2022, 09:36 PM IST
Pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय? महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही हे फळ title=

मुंबई : डाळिंब हे एक सुपरफ्रूट आहे. फळांचे आपल्या आरोग्यासाठी फायदे असतात. हे तर आपल्याला माहित आहे. परंतु डाळिंब खाण्याचे असे अविश्वसनीय फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी यांसारखे अनेक औषधी  घटक आहेत. याला सुपर स्किन फूड देखील मानले जाते, कारण ते महिलांमध्ये निरोगी त्वचा, केस आणि पचन वाढवते. डाळिंब हे जगातील सर्वात प्राचीन फळांपैकी एक मानले जाते. महिलांच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले, तर महिलांसाठी डाळिंबाचे अनेक फायदे आहेत.

पुरुषांसाठीही डाळिंब फायदेशीर आहे हे नाकारता येणार नाही, पण महिलांच्या अनेक समस्या डाळिंबामुळे दुर होताता हे देखील तेवढंच खरं आहे. महिलांच्या आरोग्यासाठी डाळिंब कसं फायद्याचं आहे ते जाणून घ्या.

1) अँटिऑक्सिडंट्

डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. याच्या बियांमध्ये पॉलीफेनॉल असतात, ज्यामुळे अन्नामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील मिळतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर कोणत्याही फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. असे मानले जाते की, त्यात ग्रीन टीपेक्षा तिप्पट अँटीऑक्सिडंट्स असतात.

2) प्रजनन क्षमता वाढवते

डाळिंबाचे फळ ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हे फळ प्रजननक्षमतेत ही मदत करते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे महिलांची अंडी खराब होतात आणि मुलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. डाळिंबाचा रस महिलांच्या प्लेसेंटामध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतो.

3) निरोगी त्वचेसाठी फायदेशीर

डाळिंब आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा आणि खाज येण्यापासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, डाळिंब मुरुम काढून टाकण्याच्या उत्पादनांमध्ये देखील उपस्थित आहे, कारण हे फळ मुरुमांपासून बचाव करण्यासाठी तसेच आपल्या त्वचेला आतून बाहेरून चमकदार बनवण्याच मदत करते. काळे डाग कमी करण्याच्या आणि संभाव्य सुरकुत्या रोखण्याच्या क्षमतेसाठी देखील या फळाचा उल्लेख केला जातो. या फळामध्ये तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करण्याची क्षमता आहे.

४) केसांच्या वाढीसाठीही गुणकारी

केसांच्या वाढीच्या समस्येवर मात करण्यासाठी डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. हे फळ तुमच्या केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करते, जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी देखील आवश्यक आहे.

5) निरोगी पचन

जर तुम्हाला पचनाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर डाळिंबाचा रस तुमच्यासाठी चमत्कार करू शकतो. डाळिंबाचा रस तुमची पचनसंस्था सुधारताना सूज कमी करण्यासाठी ओळखला जातो. निरोगी पचनासाठी त्याचा आहारात समावेश करा.

६) लैंगिक आरोग्यासाठी उत्तम

वयानुसार तुमची लैंगिक क्षमता कमी होत जाते. ही त्या नैसर्गिक गोष्टींपैकी एक आहे. यासाठी तुम्ही डाळिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, डाळिंबाचा रस पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करतो, जो एक हार्मोन आहे. जो पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सेक्स ड्राइव्ह उत्तेजित करतो.

७) रक्तदाब नियंत्रित ठेवते

दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. या रसामध्ये सिस्टोलिक रक्तदाब कमी करण्याची शक्ती आहे, याचा अर्थ असा आहे की, हे लाल फळ तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदे देते.

8) स्नायू पुनर्प्राप्ती मध्ये प्रभावी

वयानुसार स्नायू दुखू लागतात. तसेच वर्कआउट केल्यानंतर तुमच्या स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी डाळिंबाचा रस प्या. हे वेदना कमी करण्यात आणि व्यायामातून बरे होण्यात शरीराची क्षमता सुधारण्यास मदत करते.