Pressure Cooker Tips : महिलांची अर्धी कामं सोपी करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध कोणी, कधी लावला माहितीये?

Pressure Cooker Tips : एका क्लिकवर जाणून घ्या कोणी आणि कधी लावला प्रेशर कुकरचा शोध  

Updated: Nov 28, 2022, 11:18 AM IST
Pressure Cooker Tips : महिलांची अर्धी कामं सोपी करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध कोणी, कधी लावला माहितीये? title=
Pressure Cooker Tips Do you know when and who invented the pressure cooker that makes half the womens work easier nz

Kitchen Tips : स्वयंपाकघरात (Kitchen) असलेल्या अनेक भांड्यांपैकी कुकर (Pressure Cooker) हे असेच एक भांडे आहे जे आपण रोज वापरतो. कुकरमुळे महिलांची जेवणाची कामे पटापट होतात. 3 शिट्यांमध्ये खिचडी आणि भात तयार होतो. कामं पटापट व्हावीत यासाठी महिलांना कुकरची आवश्यकता असते. पण तुम्हाला माहितेय का? प्रेशर कुकरचा शोध कधी लागला, कोणी लावला, आणि त्यासंदर्भातील काही रहस्यमयी कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Pressure Cooker Tips Do you know when and who invented the pressure cooker that makes half the womens work easier nz)

प्रेशर कुकरचा शोध कधी लागला?

प्रेशर कुकरच्या शोधाची एक अतिशय मनोरंजक कथा आहे. कुकरच्या शोधाबद्दल असे म्हटले जाते की त्याचा शोध इसवी सन 1679 च्या सुमारास लागला. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध फक्त 1672 च्या आसपास लागला होता आणि 1679 मध्ये तो नवीन पद्दतीने सादर केला गेला होता.

प्रेशर कुकरचा शोध कोणी लावला?

आज आपण वापरतो तो कुकर पूर्वी असा नव्हता असे म्हणतात. संशोधकानेही त्याचा शोध स्वयंपाकासाठी नसून अन्य काही हेतूने लावला होता. डेनिस पापिन या नावाने प्रसिद्ध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने प्रेशर कुकरचा शोध लावला होता.

प्रेशर कुकर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?

आपण ज्याला प्रेशर कुकर म्हणतो त्याला पूर्वी स्टीम डायजेस्टर (Steam Digester) या नावाने ओळखले जात असे. स्टीम डायजेस्टरचा वापर पूर्वी घरात होत नसून हॉटेल आणि उद्योगांमध्ये केला जात असे, कारण ते वापरण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती वापरावी लागत असे. असे म्हटले जाते की 1915 च्या सुमारास पहिल्यांदा हे उपकरण प्रेशर कुकरच्या नावाखाली वापरले गेले. नंतर 1939 च्या सुमारास, अॅल्युमिनियम प्रेशर कुकरचे (Aluminum pressure cooker) प्रथम प्रात्यक्षिक एका शास्त्रज्ञाने केले.

प्रेशर कुकरशी संबंधित अनेक कथा

1. जेव्हा डेनिस पापिनने या अद्भुत गोष्टीचा शोध लावला तेव्हा त्याने लंडनच्या रॉयल सोसायटीसमोर त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले आणि हजारो लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले, असे म्हणतात.
2. दुसरी कथा अशी आहे की पाणी गरम करण्यासाठी आणि पाण्याची वाफ वापरण्यासाठी कुकरचा शोध लावला गेला.
3. पूर्वीच्या कुकरमध्ये शिट्टी दिसत नव्हती आणि ती स्वयंपाकासाठी वापरली जात नव्हती. 
4. साधारण 18व्या शतकात अनेक प्रकारचे कुकर बाजारात मिळू लागले. हळूहळू स्टील, अॅल्युमिनियम आणि नंतर इलेक्ट्रिक कुकर बाजारात उपलब्ध होऊ लागले.
5. भारतात 1959 पासून आधुनिक प्रेशर कुकरचा वापर केला जात असल्याची आणखी एक कथा आहे.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)