शुभ-अशुभ म्हणून नव्हे तर 'या' कारणांंमुळे फडफडते पापणी

डोळा फडफडला म्हणजे एखादा शुभ किंवा अशुभ शकुन मानला जातो. 

Updated: May 7, 2018, 06:46 PM IST
शुभ-अशुभ म्हणून नव्हे तर 'या' कारणांंमुळे फडफडते पापणी  title=

मुंबई : डोळा फडफडला म्हणजे एखादा शुभ किंवा अशुभ शकुन मानला जातो. मात्र प्रत्यक्षात या केवळ अंधश्रद्धेचा भाग आहेत. डोळा फडफडणे हे शरीरातील काही दोषांमुळे घडणारी घटना आहे. त्यामुळे शुभ की अशुभ संकेत याकडे लक्स देण्यापेक्षा तुमच्या आरोग्यामध्ये हे काही दोष तर नाहीत ना ? याची कडे  वेळीच लक्ष द्या.  

 का फडफडतो डोळा ?  

 वैज्ञानिक आधारानुसार कॅफीन किंवा अल्कोहलचं शरीरातील प्रमाण वाढल्यास तुमचा डोळा फडफडण्याची लक्षण दिसतात. 
 
सतत कॉम्युटरसमोर बसल्यानेदेखील डोळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते. डोळ्यामध्ये शुष्कता वाढल्यास, कॅफीनचे प्रमाणा वाढल्यास डोळा फडफडू शकतो. कम्युटरसमोर सतत काम केल्याने रेटिना संकुचित होतो. 

ताणतणावामुळे, खूप थकवा आल्यासही आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळेही डोळा फडफडू शकतो मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डोळ्यामध्ये खाज, सुज, अ‍ॅलर्जीचा त्रास असल्यास डोळा फडफडू शकतो. 

काही संशोधनाच्या अहवालानुसार, शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाल्यास डोळा फडफडू शकतो.