आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचे काही नियम

 दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते.

Updated: Jun 3, 2019, 05:08 PM IST
आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचे काही नियम title=

मुंबई : दूध हे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते. पण अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही दूध पिणे हा उपाय असू शकतो. तुमची पचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही. 

- अनेक लोकांना दुधात साखर घालून प्यायची सवय असते. रात्री साखर न घालता दूध प्यायल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो. दुधात एक ते दोन चमचे तूप घातल्यास अधिक फायदा होतो. 

- आयुर्वेदानुसार ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते. पिशवी बंद दूध पिण्यापेक्षा ताजे आणि जैविक दूध पिणे आरोग्यास लाभदाय ठरते. 

- अनेकांना कच्चे थंड दूध पिणे आवडते. मात्र ते चांगले नाही. दूध गरम करुन प्यावे. 

- ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करुन दुधाचे नियमित सेवन करावे.

- अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही. त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला उर्जा मिळते. 

- कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. दुधासोबत आंबट फळेही खाऊ नयेत.