सावधान! तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खोटं बटर कसं ओळखायचं जाणून घ्या

बटर हा असा पदार्थ आहे जो आपल्या जेवण्याची चव वाढवते आणि मुलांनाही ते खायला खूप आवडते.

Updated: Feb 2, 2022, 08:29 PM IST
सावधान! तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खोटं बटर कसं ओळखायचं जाणून घ्या title=

मुंबई : बटर हा असा पदार्थ आहे जो आपल्या जेवण्याची चव वाढवते आणि मुलांनाही ते खायला खूप आवडते. हा एक दुधापासून तयार होणारा एक पदार्थ आहे. त्यामुळे तो आपल्या शरीराला चांगले पोशक तत्व दोतो. परंतु हे जरी खरं असलं तरी ते आपल्या आरोग्याला हानि देखील पोहोचवू शकतं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं हानिकारक असु शकतं? यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लोणी हे आरोग्यासाठी फारसे फायदेशीर मानले नसले तरी ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमचे नुकसान देखील होत नाही.

असे बरेचदा दिसून येते की, ते दररोज सकाळी त्यांच्या टोस्टवर बटल लावून खातात. तुम्हीही असे करत असाल तर समजून घ्या की, तुम्ही हळूहळू अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात. 
दरम्यान, सर्वात गंभीर बाब म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणात नकली किंवा बनावट बटरची विक्री होत आहे. हे लक्षात घ्या की बनावट बटर आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते आणि तुम्‍हाला धोका निर्माण करू शकते.

जर तुम्ही देखील बटर प्रेमी असाल आणि तुम्हाला खरं आणि बनावट बटरमधील फरक माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला ते करण्यासाठी मदत करू शकतात.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) वेळोवेळी खाद्यपदार्थांच्या अस्सलतेबद्दल माहिती आपल्याला देत असते.

त्यापूर्वी हे जाणून घ्या की, जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने आरोग्यासाठी काय नुकसान होऊ शकते.

फॅट वाढते

लोणीमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. एका चमचेमध्ये सुमारे सात ग्रॅम फॅट असते. याचे जास्त सेवन केल्याने तुमचे LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतात. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे एथेरोस्क्लेरोसिस वाढू शकतो आणि रक्ताच्या गुठळ्या, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हृदय रोगचा धोका

बटर हे तुमच्या शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयासाठी धोकादायक असते. त्याच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्या काम करण्यापासून रोखतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची खात्री आहे.

मधुमेहाचा धोका

जास्त प्रमाणात लोणी खाल्ल्याने व्हिसरल फॅट विकसित होण्याची शक्यता वाढते. यामुळे तुमच्या ओटीपोटात अतिरिक्त चरबी जमा होऊ शकते. यामुळे, हृदयविकार, अल्झायमर आणि टाइप 1 मधुमेहासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

पोटाची चरबी वाढू शकते

यामुळे पोट आणि आतड्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते.  जेव्हा तुम्ही जास्त बटर खातात, तेव्हा तुम्हाला जलद लठ्ठपणा येऊ शकतो. खरे किंवा बनावट बटर असो ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरे बटर आणि बनावट बटरमध्य फरक कसा शोधावा?

दोन पारदर्शक वाट्या घ्या. त्या पाण्याने भरा. दोन्हीमध्ये अर्धा चमचा बटर घाला. यानंतर भांड्यांमध्ये आयोडीनच्या द्रावणाचे दोन ते तीन थेंब टाका. असे केल्याने मूळ बटरचा रंग बदलणार नाही, तर बनावट बटरचा रंग मात्र बदलून निळा होईल. यावरुन तुम्ही दोन्ही मधली फरक ओळखू शकता. ही माहिती FSSAI ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. यामुळे लोकांना फायदा होईल.