मुंबई : बहुतेक लोक टिफिन पॅकिंग, अन्न साठवण्यासाठी, तसेच पार्सल सेवेत अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) किंवा फॉइल पेपर वापरतात. कारण असे मानले जाते की, त्यात अन्न ठेवल्याने ते ताजे राहते, परंतु त्यात असलेले रसायने तुम्हच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलचा (Aluminium Foil) जास्त वापर केल्याने मानवी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
तज्ञांच्या मते, अन्न थंड झाल्यावर काही काळ अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जाऊ शकतो, परंतु जास्त काळ अन्न त्यात ठेवणे हे चांगले नाही. कारण, प्रत्येक खाद्यपदार्थाचे एक निश्चित शेल्फ लाइफ असते. यानंतर अन्नपदार्थ आजूबाजूच्या वातावरणातील बॅक्टेरिया शोषू लागतात आणि त्यात असलेले तेल आणि मसाले अॅल्युमिनियमसह प्रतिक्रिया करु लागतात. त्याचा तुमच्या याचा आरोग्यावर परिणाम होतो.
जेव्हा गरम अन्न खोलीच्या तपमानावर बऱ्याच काळासाठी ठेवले जाते, तेव्हा दोन तासांच्या आत त्यात बरेच जीवाणू जमा होतात. अॅल्युमिनियम फॉइलमुळे (Aluminium Foil) अशा बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही वाढतो.
1. बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यासाठी अन्न नेहमी एअर टाइट कंटेनरमध्ये साठवा.
2. स्वयंपाक केल्यानंतर, ते दोन तासात अन्न खा.
3. दुग्धजन्य आणि मांस उत्पादनांमध्ये बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात, त्यामुळे त्यांना फॉइल पेपरमध्ये ठेऊ नका.
4. तीन तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले नाही.
अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) पेपरमध्ये पॅक केलेले अन्न खाल्ल्याने पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होते. ज्यामुळे, त्यांना वडील होण्यात समस्या येऊ लागतात.
त्याचप्रमाणे काही लोक खूप गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये पॅक करतात. परंतु फॉइल पेपरमध्ये पॅक केलेले गरम अन्न खाल्ल्याने तुम्हाला अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो.