BEAUTY HACKS: बदलत हवामान, बदलते ऋतू या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर पडतो (pollution affects on skin) आणि दिसतो सुद्धा . अशावेळी आपला बदललेला चेहरा पाहून आपण नाराज होतो आणि मग आपला मोर्चा वळतो ते थेट पार्लरच्या दिशेने. हजारो रुपये खर्च करून आपण तात्पुरते skin छान करून घेतो मात्र काही दिवसांनी जैसे थेच ..
पण आपण अशावेळी फक्त लक्ष देतो ते आपल्या चेहऱ्याकडे पण तुम्हाला माहित आहे का हात आणि पायाची त्वचासुद्धा तितकीच नाजूक असते आणि त्याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करतो (dont ignore hand and leg skincare). हे अतिशय चुकीचं आहे.
त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या आणि हाता-पायांच्या त्वचेत खूप फरक जाणवतो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रमास जातो तेव्हा सर्वात पहिल लक्ष आपल्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर जात.
पण गरजेचं नाही की, फक्त बाहेर जातानाच हात किंवा पायांवर लक्ष द्यावं. चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे हात आणि पायांच्या त्वचेची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे.
चला तर जाणून घेऊया यासाठी घरात बसल्या बसल्या काय करू शकतो यासाठी तुम्हाला जास्त पैसे सुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये .
१. लिंबू आणि मध
एका वाटीत थोडं मध आणि लिंबाचे काही थेंब एकत्र करा. या मिश्रणात ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन आपल्या पायांवर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. असे केल्यास पायांची त्वचा स्वच्छ आणि मुलायम दिसून येते. नंतर कोमट पाण्यात पाय टाकून ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा.
२. हळद, बेसन आणि दही (besan dahi haldi pack)
दह्यात हळद आणि बेसनाचे एकत्र मिश्रण तयार करुन त्याचा पायांना स्क्रब करा. त्यामुळे पायांचे डाग हळूहळू दूर होतील.
३. ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल
ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल (olive oil) एकत्र करुन एका बाटलीत भरुन ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी पायांवर त्याचा मसाज करा. शक्य असल्यास रात्रभर तसेच ठेवल्याने फायदा होऊ शकतो.
४. कच्च दूध (raw milk)
कच्च्या दुधाने मालिश केल्यास तुमच्या पायांची त्वचा मुलायम होते. कच्च्या दुधात थोडं गुलाब पाणी एकत्र करुन मालिश केल्याने पायांना येणारी दुर्गंधी दूर होते. कच्च दूध वापरल्याने पायांची नखे स्वच्छ आणि चमकदार होतात.