तुम्ही 'स्टेरॉईड'युक्त औषधं घेत असाल तर सावधान? हे वाचा

तुम्ही स्टेरॉईडवर आहात का? तर स्टेरॉईडविषयी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या की स्टेरॉईड काय आहे? 

Updated: Aug 16, 2019, 06:19 PM IST
तुम्ही 'स्टेरॉईड'युक्त औषधं घेत असाल तर सावधान? हे वाचा title=

मुंबई : तुम्ही स्टेरॉईडवर आहात का? तर स्टेरॉईडविषयी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या की स्टेरॉईड काय आहे? तर स्टेरॉईड हे एक मानव निर्मित औषध आहे, जे कोर्टिसोलपासून मिळतं. स्टेरॉईड सारखी औषधं तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार करतात. हे शरीराच्या अवयवांची सूज तसेच संबंधीत दुखण्याला कमी करण्याचं काम करतं.

स्टेरॉईडचा उपयोग खालील व्याधीत होतो...

सोरायसिस, वितिलिगो - त्वचेवरील पांढरे डाग, संधीवात - सांध्यांचा आजार, डोळे येणे, दमा, मानसिक आजार

स्टेरॉईडचे दुष्परीणाम

ऑस्टीयोपोरोसिस - हाडं कमजोर तसेच ठिसूळ होणे.
कमजोरी, मोतीबिंदू, मधुमेह, रक्तदाब वाढणे (बीपी वाढणे), त्वचा पातळ होणे.
एन्ले-पिंपल्स येणे, त्वचेचा रंग बदलणे, नको त्या अनावश्यक ठिकाणी शरीरावर केस येणे.

मग स्टेरॉईडचा वापर कसा करायचा

१) डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय स्टेरॉईड घेऊ नका.
२) एकदा लिहून दिलेले औषध डॉक्टरांना विचारल्याशिवाय पुन्हा घेत बसू नका.
३) मेडिकल दुकानदाराच्या सल्ल्यावर स्टेरॉईड घेऊ नका.
४) स्टेराईड सांगितल्याप्रमाणे नियमित वेळेवर घ्या
५) जर तुम्ही स्टेरॉईडच्या गोळ्या घेत असला, तर कॅल्शियम- विटामीन डी सप्लिमेंटला विसरू नका.
६) डॉक्टरांनी सांगितल्यावर लगेच डोस कमी करा.
७) एक कोर्स पूर्ण करा मध्येच सोडू नका, जेवढे दिवस सांगितले तेवढेच दिवस घ्या, परस्पर औषधं खाऊ नका.
८) मला बरं वाटतंय, म्हणून मित्र परिवाराला स्टेरॉईड घेण्याचा सल्ला देऊ नका.
९) डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करा.
१०) डॉक्टरांना नक्की विचारा, कधी आणि किती स्टेरॉईड घ्यायचं आहे.