मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात वाहतुकीच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर औषधांच्या वितरणातही केला जातोय. शनिवारी देशात 'मेडिसिन फ्रॉम द स्काय' ही योजना सुरू झाली. तेलंगणाच्या 16 ग्रीन झोनमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शनिवारी सुरू करण्यात आला. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याचं उद्धाटन केलंय.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून औषधं दूरच्या भागात ड्रोनद्वारे पोहोचवली जातील. लस आणि इतर आवश्यक वस्तू ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात सहज पोहोचवता येतात. या प्रकल्पाचा डेटा विश्लेषण तीन महिन्यांनी केले जाईल. यानंतर, नागरी उड्डयन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्र मिळून संपूर्ण देशासाठी एक आदर्श तयार करतील. त्यांनी हा दिवस देशासाठी अतिशय क्रांतिकारी दिवस असेल.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह, तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव देखील मेडिसिन फ्रॉम स्काय योजनेच्या प्रक्षेपणाच्या प्रसंगी उपस्थित होते. सिंधिया म्हणाले की, वाहतुकीच्या उद्देशाने हा आपल्या प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. विमानतळ आणि धोरणात्मक सुधारणांबाबत 16 कलमी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
2030 पर्यंत भारत ड्रोन कॅपिटल बनेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलीये. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एअर टॅक्सी आणि स्काय टॅक्सीला देशाचं भविष्य सांगितलं.