पार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी

प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 17, 2017, 11:42 PM IST
पार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी title=

मुंबई : प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.

वास्तव पाहता आपल्या पार्टनरसोबत नाजूक, हळवे क्षण साजरे करायला कोणालाही आवडते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात इतका वेळच कोणाकडे असतो. त्यातही जरी वेळ असलाच तर, ते क्षण साजरे करायचे कोठे ? हा अनेकांच्या समोरचा महत्वाचा प्रश्न. कारण ठिकाण ठरवून तसे प्लॅनिंग करण्यातच बहुतांश वेळ खर्च झाल्यावर प्रत्यक्ष अशा ठिकाणी जायला आणि तिथे रहायला फारच कमी दिवस मिळतात.

आयुष्यात पैसा, वेळ हे सारे काही महत्वाचे आहेच. त्याला कोणीच कमी लेकणार नाही. परंतु, अनेकजण हाच पैसा कमावण्याच्या इतके मागे लागतात की, हे सर्व आपण का करतो आहोत, हेच ते विसरतात. म्हणूनच लक्षात ठेवा तूम्ही काहीही करा. पण, सगळ्यात महत्वाचे अहात ते तूम्ही. तुमचा पार्टनर आणि मग तूमचे घर आणि इतर नातेवाईक. आपण जीवनात जे कष्ट करतो. जो त्रास सहन करतो तो याचसाठी. मग आनंदाचे काही क्षण आपल्या लोकांसोबत घालवायला काय हरकत आहे. त्यासाठी तूम्ही जर काही प्लानिंग करत असा तर पूढील ठिकाणे तुम्हाला नक्की फायदेशीर ठरू शकतात.

१ – वेरोना, इटली (Verona, Italy)
२ – पॅरिस, फ्रान्स (Paris, France)
३ – आगरा, भारत (Agra, India)
४ – अल्हाम्ब्रा, ग्रेनाडा, स्पेन (Alhambra Granada, Spain)
५ – लंडन, ग्रेट ब्रिटन (London, Great Britain)
६ – सॅन फ्रांन्सिस्को, कॅलिफोर्निया (San Francisco, Kalifornia)
७ – वेनेकूवर, ब्रिटिश कोलंबिया, कनाडा (Vancouver, Canada)
८ – शूनब्रुन पॅलेस, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया (belvedere palace, vienna Austria)
9 – बुर्बों स्ट्रीट, न्यू ओरलियन्स, यूएसए (Ryu bourbon street, New orleans, America)
10 – ऑस्ट्रेलिया-द वाइटसनडेज (Australia the whitsundays)