Tunnel Vision: डोळ्यांचा असा एक गंभीर आजार, ज्यामध्ये तुम्ही थेट लोकांना धडकता

हा आजार आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो. म्हणूनच या आजारबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

Updated: Sep 17, 2022, 03:25 PM IST
Tunnel Vision: डोळ्यांचा असा एक गंभीर आजार, ज्यामध्ये तुम्ही थेट लोकांना धडकता title=

Eye Care: आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे. आपल्या डोळ्यात धुळीचा एक कण जरी गेला तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या डोळ्यांच्या नैसर्गिक सुरक्षेसाठी डोळ्यावर पापण्या देखील असतात. आपण डोळ्यांनी केवळ समोरच पाहत नाहीत तर आजूबाजूला, डोळ्यांच्या कोपऱ्यातून देखील पाहतो (Corner Eye Problem) . अशात आज या बातमीत आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या एका अशा आजाराबाबत सांगणार आहोत ज्याबाबत तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. या बातमीत आम्ही तुम्हाला टनेल व्हिजनबाबत ( Tunnel Vision ) सांगणार आहोत. 

सध्या आपल्याला जो तो व्यायाम करायला हवा, वजन कमी करायला हवं, हृदयाची काळजी घ्यायला हवी याबाबत सल्ला देत असतो. मात्र, आपल्याला क्वचितच असं कुणी भेटेल जो आपल्याला डोळ्यांची काळजी घयायला सांगत असेल. सध्याच्या डिजिटल जगात डोळ्यांची काळजी घेणं अनिवार्य झालं आहे. लहानपणीच मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागलेला आपण पाहतो. प्रत्येक तिसऱ्या किंवा चौथ्या माणसाला डोळ्यांचा आजार झालेला पाहतो. अनेकदा हे अणुवंशिक असतं. मात्र सध्याच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे तुमचे डोळे कमजोर होऊ शकतात. यानेच तुम्हाला टनेल व्हिजनचा आजारही होऊ शकतो.  (Tunnel Vision) 

हा आजार आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो. म्हणूनच या आजारबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या आजाराची लक्षणं आणि यावरील इलाजांबाबत   

टनेल व्हिजन म्हणजे नेमकं काय? (What is Tunnel Eye Vision) 

टनेल व्हिजनमध्ये तुमच्या डोळ्यांची कडेची दृष्टी खराब होत जाते. यामुळे तुम्हाला समोरच्या गोष्टीही नीट दिसत नाहीत. या त्रासामुळे तुमची केवळ सेंट्रल व्हिजन काम करत असल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टी एका टनेलमध्ये असल्याचं भासतं. 

टनेल व्हिजन व्हिजनची लक्षणं काय? (Symptoms Of Tunnel Vision)

जर कुणाला ही टनेल व्हिजन आहे असं वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. 

  • गर्दीतून मार्ग काढणं कठीण होतं
  • तुमची अनेक वस्तूंना धडकू शकतात
  • तुम्हाला नीट दिसत नसल्याने तुम्ही पडू शकतात 

टनेल व्हिजनची कारणे  काय? ( Reasons Of Tunnel Vision )

  • तुम्हाला मायग्रेन असल्यास तुम्हाला या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं
  • स्ट्रोकची लक्षणे 
  • ग्लुकोमा 
  • ज्यांना डायबिटीस आणि डोक्याचा त्रास आहे 

टनेल व्हिजन असल्यास काय कराल

  • जर तुम्हाला वरील लक्षणं जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 
  • तुम्हाला मायग्रेन असल्यास त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयन्त करा 
  • रुटीन चेकअपसाठी डोळ्यांच्या डॉक्टरांना नियमित भेटणे फायद्याचे ठरू शकते . 
  • डॉक्टर तुम्हाला याबाबत योग्य मार्गदर्शन करू शकातात.