Clove Water Benefits: पोट बिघडलेले असले की संपूर्ण दिवस खराब जातो. अशावेळी अनेक प्रकार केले जातात. पोटाच्या समस्येवर घरगुती उपायही खूप परिणामकारक असतात. आपल्या आयुर्वेदात असे अनेक उपाय सांगितले आहेत. तर, आपल्या किचनमध्ये असलेले मसाल्यांचा वापरही पोटदुखीसाठी रामबाण आहे. लवंग हेदेखील पोटाच्या समस्यांवर रामबाण उपायआ हे. लवंगाचा वापर फक्त स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठीही केला जातो. कारण, लवंगांत औषधी गुण असतात. लवंगाचे पाणी पोटाच्या अनेक समस्यांवर एक सर्वोत्तम उपचार आहेत. पोटासाठी लवंग रामबाण उपाय मानलं जातं. लवगांच्या फायद्याची यादी खूप मोठी आहे. मात्र, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटी रोखण्यासाठीदेखील लवंगाचा वापर केला जातो.
लवंगाचे पाणी बनवण्यासाठी 4-5 लवंग आणि 1 कप पाणी लागेल. हे पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात लवंगाच्या 4-5 पाकळ्या टाका आणि हे पाणी चांगले उकळून घ्या. 5-10 मिनिटे पाणी उकळून घेतल्यानंतर ते गाळून घ्या. आता पाणी थोडे कोमट झाल्यानंतर ते प्या.
पचन सुधारते- लवंगात असलेले गुणधर्म पचनसंस्था सुधारण्यास खूप फायदेशीर आहे. ते अपचन, गॅस आणि अॅसिडीटी कमी करण्यास मदत करतात.
सूज आणि गॅसची समस्या- लवंगाचे पाणी प्यायल्याने पोटाला आलेली सूज आणि गॅसच्या समस्यावर आराम मिळतो. हे पोटात गॅस तयार होण्यापासून रोखते.
अल्सरपासून दिलासा- लवंगाचे पाणी पोटाचा अल्सर ठीक करण्यास मदत करतात. यात अँटीऑक्सीडेंट गुण असतात जे अल्सरची समस्या कमी करण्यास मदत करतात.
अँटीबॅक्टीरीयल गुणः लवंगात अँटीबॅक्टीरीयल गुण असतात जे पोटातील हानिकारक बॅक्टिरीया संपवण्यास मदत करतात. तसंच, पोटात संक्रमणापासून रोखतात.
मळमळणे आणि उलट्यांपासून दिलासाः लवंगाचे पाणी प्यायल्याने मळमळणे, उलटीची समस्या कमी करण्यास मदत करते. हे पाणी प्यायल्याने पोट शांत होते आणि उलटीची शक्यताही कमी होते.
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिऊ शकता. यामुळं पाचनसंस्था मजबूत होत आणि दिवसभर पोटाच्या समस्यांपासून आराम मिळते. जर तुम्ही अॅसिडीटीमुळं त्रासले असाल तर जेवण झाल्यानंतर लवंगाचे पाणी पिणे फायदेशीर आहे. मळमळ किंवा उलटीसारखी समस्या निर्माण झाल्यास काही प्रमाणात लवंगाचे पाणी पिऊ शकता.
- गर्भवती महिला आणि लहान मुलांना लवंगाचे पाणी देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
- लवंगाचा जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरु शकते. त्यामुळं प्रमाणातच सेवन करावे
- जर कोणाला लवंगाची अॅलर्जी असेल तर याचे सेवन करु नका
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)