उन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक

AC Side Effects: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्यालाही एसीखाली (Summer Tips) बसण्याची सवय असेलच. बाहेरून गर्मीतून आल्यावर अथवा घरीच नुसतं बसल्यावरही आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. तेव्हा आपण एसीखाली तासन् तास बसून राहतो (Ac Harmful Effects on Health) आणि त्याचे आपल्यालाही भान राहत नाही. परंतु तुम्ही ही सवय वेळीच सोडणं आवश्यक आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 3, 2023, 10:41 AM IST
उन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक  title=
फाईल फोटो

AC Side Effects in Marathi: सध्या सगळीकडेच आपल्याला कडक उन्हाचा त्रास हा सहन करावा (Summer Tips) लागतो आहे. त्यामुळे आपल्या या उकाड्यापासून वाचणं आवश्यक असते. त्यातून आपण आपल्या आपल्या परीनं उपाय हे करत असतो. अशावेळी आपल्यासाठी सोप्पा मार्ग असतो तो म्हणजे आपण आरामात आणि तासन् तास एसीच्या खाली एका रूममध्ये बसून राहतो. आपण बाहेरून आल्यावर फार थकलेलो असतो तेव्हा आपल्या थंडाव्याची आणि आरामची गरज असते अशावेळी म्हणजे हेही आपल्या नकळत होऊ शकते परंतु तुम्हाला जर का बराच वेळ असंच एसीत बसण्याची सवय असेल तर तुम्हाला ही सवय वेळीच थांबवणं गरजेचे आहे. 

सतत एसीत बसल्यानं तुम्हाला फुफ्फुसाचे आजार उद्भावण्याची शक्यता (AC tips for Summer) असते त्याचसोबत तुम्हाला अस्थमाचाही त्रास होऊ शकतो तेव्हा अशावेळी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे हे अनिवार्य असते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की जास्त वेळी एसीत बसण्याचे दुष्परिणाम नक्की काय असतात. मुळात आपल्याला येणारा घाम आणि वाटणारा उकाडा दूर करण्यासाठी एसी महत्त्वाची भुमिका बजावतो आपल्याला त्यानं चांगला आराम मिळतो आणि थंडावा मिळतो परंतु तुम्हाला माहितीये का की असं जास्तवेळ बसणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं कारण तुम्हाला एसीची हवा ही श्वासोच्छावासाद्वारे आत आणि बाहेर घेत असता. 

काय होतात परिणाम? 

  1. तुम्ही जर का जास्त वेळ एसीमध्ये बसतं असाल तर तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात. रात्री 16-18 सेल्सियस तापमानात तुम्हाला झोपायची सवय असेल तर त्याचा परिणाम तुमच्या श्वसनावर होऊ शकतो. तुम्हाला वारंवार सर्दी होऊ शकते. त्याशिवाय अंगदुखीचाही त्रास वाढू शकतो. 
  2. एसीमुळे ताजी हवा तुमच्या नाकावाटे जात नाही त्यामुळे तुम्हाला शुद्ध स्वच्छ हवा मिळत नाही. 
  3. जास्तवेळ एसीमध्ये झोपल्यानं श्वास कोंडल्यासारखा होतो. एवढंच नाही तर शरीराचे वजनही वाढते. तुम्हाला अनेक संसर्गजन्य रोगही होऊ शकतात. 
  4. एसीमध्ये जास्त वेळ बसल्यानं एसीतील हवा ही खोलीत आर्द्रता शोषून घेते आणि ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. तुम्हा अस्थामा होण्याचीही भिती असते.

काय काळजी घ्यावी? (Remedies to Avoid Health Effects from AC)

एसी रोजच्या रोज स्वच्छ करा. ह्यूमिडिफायरचा उपयोग करावा. एसीपासून लांब झोपा अथवा बसा. तापमान 24-26 डिग्री इतकंच ठेवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)