...म्हणून तुम्हाला झोपेत शिंक येत नाही, सर्व काही तुमच्या डोक्याचा खेळ, जाणून घ्या सविस्तर

झोपेत तुम्हाला शिंक का येत नाही?, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

Updated: Oct 6, 2022, 05:13 PM IST
...म्हणून तुम्हाला झोपेत शिंक येत नाही, सर्व काही तुमच्या डोक्याचा खेळ, जाणून घ्या सविस्तर title=

Sneeze : झोप ही माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान 7 तास झोप घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगतात. शिंका येणे ही एक सामान्य समस्या आहे. साधारण प्रत्येकाला दिवसातून एकदा तरी शिंक येते, असं मानलं जातं.  मात्र, दिवसातून 3 ते 4 वेळापेक्षा जास्त वेळा शिंक येत असेल तर तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. (Why don't you sneeze in your sleep? Everything is a game of your head)

शिंकल्यामुळे आपल्या नाकातून धुळ आणि जंतू बाहेर पडतात. मात्र, अनेकदा रात्री झोपल्यानंतर तुम्हाला शिंका येत नाही, हे तुमच्या देखील लक्षात आलं असेल. रात्री झोपल्यानंतर शिंका का येत नाही, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. मात्र, हा सगळा तुमच्या डोक्याचा खेळ आहे.

तुम्ही झोपेत असताना तुमचा मेंदू शरिराच्या प्रतिक्षिप्त म्हणजे रिफलेक्स प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे तुम्हाला झोपेत असताना शिंक येणे आणि खोकण्याची प्रक्रिया बंद होते. झोपेत शिंका का येत नाहीत, याला दोन प्रमुख कारणं आहेत. तुम्ही झोपेत कोणत्या अवस्थेत आहात... त्यानुसार तुमचं शरीर शिंका रिफलेक्स करतं.

नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप (NREM) म्हणजे तुमच्या झोपेचा सुरूवातीचा टप्पा असतो. तर रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणजे तुमच्या झोपेचा महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये तुम्ही स्वप्न पाहता. या दोनच फेजमध्येस तुम्ही रात्रभर असता.

झोपेत शिंका का येत नाही?

ज्यावेळी तुम्ही नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीपमध्ये असता, त्यावेळी तुमचं शरिर जास्त सेन्सिटिव्ह नसतं. त्यामुळेच तुम्ही जास्त आवाज असला तरी झोपू शकता. NREM मध्ये तुमच्या शरिराला जास्त वेदना होत नाहीत. अंतर्गत वेदना देखील सौम्य स्वरूपाच्या असतात. त्यामुळे झोपेत असताना तुम्हाला शिंका येत नाहीत.

शिंकण्यासाठी शरिराच्या स्नायूचा समतोल आवश्यक असतो. मात्र, झोपेच्यावेळी मेंदू समतोल साधू शकत नाही आणि मेंदू जागृत करण्यासाठी कोणतं माध्यम देखील नसतं. मात्र, असंही होऊ शकतं की तुम्हाला झोपेत असताना शिंक येईल, ही गोष्ट खूप कमी वेळा घडते. त्याला दोन प्रमुख कारण आहेत.

ज्यावेळी तुमच्या मेंदूला अचानक चांगला रक्तपुरवठा होतो. त्यावेळी कदाचित तुम्हाला शिंका येऊ शकतात. तर ज्याठिकाणी तुम्ही राहता. त्याठिकाणी एलर्जी वाढवणारी काही कारणं असतील तर तुम्हाला शिंका येऊ शकतात.