पुरुषांतील वंध्यत्वासाठी अनुवांशिक चाचणी महत्त्वाची का आहे? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

परिणामांवर लक्षणीय परिणाम करू शकते. पारंपारिक निदान पद्धतींद्वारे स्पष्ट नसलेली मूलभूत कारणं शोधण्यासाठी वंध्यत्वाचा अनुवांशिकतेशी काही संबंध आहे का हे समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jun 18, 2024, 02:03 PM IST
पुरुषांतील वंध्यत्वासाठी अनुवांशिक चाचणी महत्त्वाची का आहे? पाहा तज्ज्ञ काय सांगतात title=

अनुवांशिक चाचणी ही पुरुषांतील वंध्यत्वाचं मूल्यांकन आणि व्यवस्थापनात एक आवश्यक साधन बनली आहे, ज्यामध्ये महत्वाची माहिती मिळते ज्याच्या मदतीने काय आणि कसे उपचार करावे हे ठरवता येतं. याशिवाय परिणामांवर लक्षणीय परिणाम करू शकते. पारंपारिक निदान पद्धतींद्वारे स्पष्ट नसलेली मूलभूत कारणं शोधण्यासाठी वंध्यत्वाचा अनुवांशिकतेशी काही संबंध आहे का हे समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे.

अनुवांशिक कारणे ओळखणं

वरिष्ठ वैज्ञानिक - रीप्रॉडक्टीव्ह जीनोमिक्सचे डॉ. शिव मुरारका म्हणाले, पुरुषांतील वंध्यत्वाचा बऱ्याचदा अनुवांशिक अडचणींशी संबंध असू शकतो, ज्यामध्ये गुणसूत्र विसंगती, जनुकातील बदल किंवा त्यांचे प्रमाण कमी होण्याचा समावेश असू शकतो. क्लाइनफेल्टर सिंड्रोम सारख्या सामान्य अनुवांशिक समस्या (अशी स्थिती जिथे पुरुषांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र असते), वाय क्रोमोसोम मायक्रोडिलीशन आणि सीएफटीआर जीनमधील बदल (सिस्टिक फायब्रोसिसशी संबंधित) यामुळे शुक्राणूंचे उत्पादन आणि त्याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. असे काही विकार असल्यास ते अनुवांशिक चाचणी मध्ये समजू शकते, त्यातून वंध्यत्वाचे कारण समजते आणि योग्य उपचार पर्याय ठरवणे शक्य होते.

वैयक्तिक उपचार योजना

एकदा वंध्यत्वाचे अनुवांशिक कारण समजल्यानंतर, व्यक्तीच्या स्थितीनुसार काय उपचार करायचे ते ठरवले जाऊ शकते. उदाहरणार्थ, वाय क्रोमोसोम मायक्रोडिलेशन असलेल्या पुरुषांना इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (आय सीएस आय) सारख्या असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) उपचाराचा सल्ला दिला जाऊ शकतो. कारण त्यांच्या बाबतीत पारंपरिक उपायांचा परिणाम होण्याची शक्यता नसते, असंही डॉ. शिव म्हणाले.

अनुवांशिक विकारांचे संक्रमण रोखणे

मुलांमध्ये अनुवांशिक विकारांचे संक्रमण रोखण्यासाठी अनुवांशिक चाचणी महत्त्वपूर्ण आहे. जर पुरुषांत काही आनुवंशिक आजार असतील तर त्यांच्या मुलांकडे ते जाण्याचा धोका असू शकतो, ज्यामुळे पुढच्या पिढीत आरोग्यविषयक समस्या किंवा वंध्यत्व समस्या उद्भवू शकते. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) करायचे असल्यास इम्प्लांटेशनपूर्वी अनुवांशिक अडचणी जाणून घेण्यासाठी भ्रुणाची तपासणी करण्यासाठी प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्ट (पीजीटी) चा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे अनुवांशिक विकार संक्रमित होण्याचा धोका कमी होतो.

मानसिक आणि भावनिक समर्थन

अनुवांशिक निदान केल्याने वंध्यत्वाचं निश्चित कारण समजल्यास मानसिक आणि भावनिक आराम मिळू शकतो. खासकरून अशा पुरुषांना ज्यांना वंध्यत्वाचे कारण न समजल्याने त्रास होत असतो. अनुवांशिक कारणं समजल्याने जोडप्यांना उपलब्ध पुनरुत्पादन पर्याय आणि कुटुंब नियोजन, संबंधी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत मिळते. पुरुषाच्या वंध्यत्वामध्ये आनुवंशिक कारणं आहेत का समजून घेण्यासाठी, त्यानुसार उपचार करण्यासाठी तसेच आनुवंशिक विकार पुढील पिढी मध्ये जाऊ नये तसेच असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) यशस्वी व्हावी यासाठी आनुवंशिक चाचणी महत्वाची असते, असंही डॉ. शिव मुरारका यांनी सांगितलं आहे.