Green Chana Saag: हिवाळ्यात एकदातरी बनवा ही भाजी; सोपी आणि हेल्दी.... करुन तर पाहा

Green Chana Saag in Winter : हिवाळ्यात हवामानात आलेला गारवा सहन करण्यासाठी तुम्ही शरीराचं तापमान संतुलित ठेवणं अपेक्षित असतं. यामध्ये आहाराच्या सवयी फायद्याच्या ठरतात. ही भाजी त्यामध्ये मोठी भूमिका बजावते. 

Updated: Jan 24, 2023, 10:19 AM IST
Green Chana Saag: हिवाळ्यात एकदातरी बनवा ही भाजी; सोपी आणि हेल्दी.... करुन तर पाहा
Winter Food how to make green Chana Saag read recipe

Chana Saag In Winters: भारतामध्ये (India Winter wave) थंडीनं चांगलाच जोर धरलेला असताना साधारण आणखी महिनाभर तरी हे असंच वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं थंडीमुळं दारंखिडक्या बंद करून न बसता या ऋतूचा आनंद घ्यायला शिका. सर्वप्रथम आहाराच्या काही सवयी बदला, ऋतूनुसार येणारी फळं (Fruits) आणि भाज्या (Vegetables) खाण्याला प्राधान्य द्या. 

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. (Spinach) पालक, मेथी (Methi), चंदनबटवा त्यासोबतच आणखी एक भाजी हिवाळ्याच्या दिवसांध्ये नक्की खा. ती म्हणजे हरभऱ्याच्या पाल्याची. हिरव्या चण्याची म्हणजेच हरभऱ्याची पानं देशातील बहुतांश भागांमध्ये आवडीनं खाल्ली जातात. त्यापासून बहुविध पदार्थ तयार केले जातात. 

हरभऱ्याच्या पाल्याचे अनेक फायदे 

हरभऱ्याच्या पाल्यामध्ये प्रथिनं, तंतुमय पदार्थ आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान. तुम्ही आतापर्यंत हरभरा भाजून खाल्ला असेल, आता करून पाहा त्याच्या पानांच्या भाजीची सोपी रेसिपी (Chana Saag recipe). 

अळूप्रमाणेच हरभऱ्याचं फतफतं बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारातून हरभऱ्याचा पाला आणा. तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. आता मुगाडी डाळ स्वच्छ धुवून घ्या. एका प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये ही डाळ शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याचा पाला टाका. आता पाला काही वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये आलं- लसूण मिरचीची पेस्ट टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. 

हेसुद्धा वाचा : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा 

मिश्रण मंद आचेवर शिजू द्या. आता एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी मिसळून एक घट्टसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार पालेभाजीमध्ये टाकून एकजीव करून घ्या. हरभऱ्याच्या पाल्याचं मिश्रण तयार होताच गॅस बंद करा. आता एका फोडणीच्या भांड्यामध्ये राईचं तेल किंवा तूप तापवा आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, जिरं- मोहरी, हिंग, लाल मिरची अशी फोडणी घाला. फोडणी चांगली तडतडल्यानंतर कुकरमधील मिश्रणात ओता. एकदा सर्व मिश्रण एकजीव करा आणि गरमगमरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत त्याची चव घ्या.