World Sleep Day 2023: आपल्या आयुष्यात झोप ही महत्त्वाची आहे. झोपेला आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे परंतु झोपेच्या शास्त्रीय महत्त्वाप्रमाणे(Scientific Facts of Sleep) तुम्हाला माहितीये का की झोपेच्या काही अशा रंजक गोष्टीही आहेत ज्या तुम्हालाही कदाचित माहिती नसतील. जगात झोपेवर अनेकदा संशोधन (Scientific Research of Sleep) होताना दिसते. त्या संशोधनात अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. झोप आपल्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून आराम देते. त्यातून आपल्याला दिवसातून 8 तास झोप ही महत्त्वाची असतेच. अपुऱ्या झोपेचा आपल्या आरोग्यावरही होतो आणि हा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो व तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. आज 'वर्ल्ड स्लिप डे' (World Sleep Day) आहे या निमित्ताने जाणून घेऊया झोपेविषयीच्या काही भन्नाट गोष्टी.
झोपविषयी आपल्या सगळ्यांनाच कदाचित फार कमी माहिती असेल त्यातून झोप आणि स्वप्न याचेही अनोखे नाते आहे. मुळात स्वप्न पडण्यावरूनही अनेक मतप्रवाह आहेत. पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या स्वप्नातून दिसतात. त्याचबरोबर एकच स्वप्न हे सारखं सारखं पडणं त्यानंतर पुर्नजन्माचा (Sleep and Dream Theories) संबंध अशा एक नाही तर अनेक गोष्टी आपण वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील.
परंतु शास्त्रानुसार, स्वप्न पडणं हे आपल्या विचारांचेच प्रतिबिंब असते. आपले विचार कसे आहेत आणि त्यावेळी आपल्या भावना कशा जागृत होतात त्यावर ते अवलंबून असते. परंतु झोपेचा संबंध आपला व्यक्तिमत्त्वापासून, वय, लिंग, विचार आणि परिस्थिती यांच्याही संबंधित असू शकतो. तेव्हा जाणून घेऊया की टॉप इंटरेस्टिंग फॅक्ट्स