Year End 2022: कोरोनाशिवाय 2022 मध्ये 'या' संसर्गांनी घातलं होतं थैमान

वर्ष 2022 येईपर्यंत अनेक लोकांचा यामुळे बळी गेल्याचीही नोंद आहे. 2022 मध्ये कोरोनाशिवाय अजून काही जीवघेणे आजार किंवा संसर्ग (Infection) आले होते, ज्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली होती. 

Updated: Dec 29, 2022, 08:28 PM IST
Year End 2022: कोरोनाशिवाय 2022 मध्ये 'या' संसर्गांनी घातलं होतं थैमान title=

Coronavirus: चीनमध्ये कोरोना (Corona in China) प्रसार पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. यामुळे जगभरात लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. चीनमध्ये सापडलेल्या  BF.7 व्हेरिएंटने (Corona BF.7 varient) देशात पसरायला सुरुवात केलीये. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची (Corona) शंभर केसेस समोर आल्या आहेत. एक वेळ अशी देखील आली होती, जेव्हा लोकांनी कोरोनामुळे स्वतःला घरात डांबून घेतलं होतं. 

वर्ष 2022 येईपर्यंत अनेक लोकांचा यामुळे बळी गेल्याचीही नोंद आहे. 2022 मध्ये कोरोनाशिवाय अजून काही जीवघेणे आजार किंवा संसर्ग (Infection) आले होते, ज्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली होती. हे संसर्ग कोणते आहेत, ते जाणून घेऊया.

झिका व्हायरस (Zika Virus)

यंदाच्या वर्षी एक वेळ अशी होती जेव्हा कोरोनाप्रमाणे झिकाची भीती देखील प्रत्येकाच्या मनात होते. हा व्हायरस डासांच्या चावल्यामुळे पसरत होता. गेल्या काही काळामध्ये याची बरीच प्रकरणं जगभरात नोंदवली गेली. रिपोर्ट्सनुसार, हा धोकादायक व्हायरस पसरण्यामाने एडीज नावाची डासांची जात कारणीभूत असू शकते.

मंकीपॉक्स (Monkeypox Virus)

मंकीपॉक्स एक धोकादायक संसर्ग आहे. ज्याचा वेळेवर इलाज न झाल्याने तो जीवघेणा ठरू शकतो. 1958 मध्ये पहिल्यांदा हा संसर्ग माकडांमध्ये पहायला मिळाला. मंकीपॉक्सच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता, त्यावेळी याला महामारी घोषित करण्यात आली. याची लक्षणं कांजिण्याप्रमाणे असून त्यामध्ये ताप, डोकेदुखी आणि थकवा यांचाही समावेश होता. काही रूग्णांच्या शरीरावर यावेळी लाल रंगाचे पुरळ देखील उठू शकतात. 

टोमॅटो फ्लू (Tomato flu)

यंदाच्या वर्षी टोमॅटो फ्लूने जगाच्या अनेक भागांमध्ये थैमान घातलं होतं. रिपोर्ट्सप्रमाणे, केरळमध्ये 80 पेक्षा जास्त प्रकरणं 2022 मध्ये दिसून आली. लहान मुलांमध्ये याचा अधिक संसर्ग पहायला मिळाला. या संसर्गामध्ये थकवा, उलट्या, मळमळ आणि जुलाब यांचा त्रास रूग्णाला होतो. याशिवाय ताप आणि सांधेदुखीची समस्या देखील बळावते.