जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनाने घेतला ११ जणांंचा बळी

  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात झालेल्या हिमस्खलनाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतलाय. 

Updated: Jan 7, 2018, 12:22 PM IST
जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनाने घेतला ११ जणांंचा बळी  title=

  जम्मू-काश्मीर :  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात झालेल्या हिमस्खलनाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतलाय. 

  
मदतकार्य सुरु 

  
 हिमस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये मदतकार्य सुरु असल्याची माहिती अधिका-यांनी दिलीये. ही घटना घडली त्यावेळ 8 जण गाडले गेले होते त्यानंतर हा आकडा वाढून 11वर गेल्याची माहिती काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी दिलीये. 

  
सीमा रस्ते संघटनेचे   

  मृतांमध्ये सीमा रस्ते संघटनेच्या अधिका-याचाही समावेश आहे. बीआरओच्या तीन अधिका-यांना बाहेर काढण्यात यश आलंय. दरम्यान अजूनही या भागात मदतकार्य वेगानं सुरु असू दाट धुक्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या मदत कार्यात अडथळे येत आहेत.