कुलगाममध्ये २ दहशतवादी ठार, शोपियामध्ये ३ दहशतवाद्यांना घेरलं

जम्मू-काश्मीरमध्ये दहशवताद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाममध्ये सुरक्षा रक्षकांना २ दहशवताद्यांना ठार केलं आहे. तर शोपियामध्ये ३ दहशवताद्यांना जवानांनी घेरलं आहे. शोपियामध्ये चकमकीत एक मेजर आणि एक जवान शहीद झाला आहे. तर जवान जखमी झाला आहे.

Updated: Aug 3, 2017, 09:16 AM IST
कुलगाममध्ये २ दहशतवादी ठार, शोपियामध्ये ३ दहशतवाद्यांना घेरलं

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशवताद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाममध्ये सुरक्षा रक्षकांना २ दहशवताद्यांना ठार केलं आहे. तर शोपियामध्ये ३ दहशवताद्यांना जवानांनी घेरलं आहे. शोपियामध्ये चकमकीत एक मेजर आणि एक जवान शहीद झाला आहे. तर जवान जखमी झाला आहे.

सुरक्षा रक्षकांना मध्यरात्री २.३० दरम्यान गस्त घालत असतांना कळाले की मातृबुगमध्ये काही दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी ऑपरेशन सुरु असतांना जवानांच्या गाडीवर फायरिंग सुरु झाली. ज्यामध्ये एक मेजर आणि २ जवान जखमी झाले. त्यांना लगेचच हॅलिकॉप्टरने श्रीनगरला आणण्यात आलं. पण उपचारादरम्यान मेजर आणि एका जवानाने प्राण सोडले.