नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. शुक्रवारी शोपियातल्या पंडुशान गावात दहशतवाद्यांसोबत सुरू झालेली चकमक सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा दलांनी शोपियामध्ये आज आणखी एका दहशतवाद्याला ठार केलंय. सोबतच शनिवारी सकाळी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक पुन्हा सुरू झाली. गेल्या २४ तासांत तीन दहशतवादी ठार झालेत. सोबतच एका जवानालाही या चकमकीत आपले प्राण गमवावे लागलेत तर आणखीन दोन जवान जखमी झालेत.
सुरक्षा दलाला गुरुवारी रात्री शोपियाच्या पंडुशान गावात काही दहशवातवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षादलानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. याच दरम्यान सुरक्षादल आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जीनत उल इस्लाम नायको सहीत दोन दहशतवादी ठार झालेत. जीनत याचा मृतदेह सुरक्षादलानं ताब्यात घेऊन शुक्रवारी रात्री त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला.
जीनत हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा स्थानिक कार्यकर्ता होता. शोपियामध्ये गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले घडवून आणण्यात त्याचाही हात होता.