7th Pay Commission: सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

केंद्र सरकारपाठोपाठ (Central Government) आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करत आहेत.  

Updated: Oct 18, 2022, 11:57 PM IST
7th Pay Commission: सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट title=

मुंबई :  केंद्र सरकारपाठोपाठ (Central Government) आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करत आहेत. यूपी सरकारनंतर आता हरियाणा (Hariyana) सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. हरियाणा सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला आहे. वाढीव भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल. म्हणजेच या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3 महिन्यांच्या थकबाकीसह येणार आहे. आता जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पैसे वाढणार आहेत. (7th pay commission haryana government hike da and dr hike by 4 percent)

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना
4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2276/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2276 X12 = रु. 27,312

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.720/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720 X12 = रु 8640 

केंद्र सरकारने नुकताच कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला आहे. त्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारनेही राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी भेट देत महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात 4% वाढ केली. ही वाढही १ जुलैपासून लागू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले की, '2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6 हजार 908 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

दुसरीकडे, झारखंड सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. ही वाढ 1 जुलै 2022 पासून लागू होईल.