Crime News : ज्याला आयुष्यभरचा सोबती म्हणून निवडला त्याने थाटलेल्या संसाराची राखरांगोळी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या गर्भवती बायकोचा गळा कापून खून केला आहे. धक्कादायक म्हणजे खून केल्यावर त्याने सासरी फोन लावत खून केल्याची माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
10 जुलै 2016 ला अंकित पाल आणि तनु यांचं लग्न झालं होतं. अंकित हा एका खासजी नोकरीमध्ये काम करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. तनु ही गर्भवती होती. मात्र, अंकितने कसलीही तमा न बाळगता तिची चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीच्या घरी फोन लावत तनुला मारल्याची माहिती दिली.
घरच्यांना फोन करून, तिला मारलं आहे, घेऊन जा अस फोनवर अंकितने सांगितलं. त्यानंतर तनुच्या घरच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. लग्न झाल्यापासून तनुचा मोठा दीर तिचा हुंड्यासाठी छळ करत होते. काहीवेळा मारहाणही केल्याचा आरोप तनुच्या घरच्यांनी केला आहे. तनुचे बाहेर संबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांनी अंकित पालला ताब्यात घेतलं असून हत्या करताना वापरलेला चाकूही घेतला आहे. मृत तनुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.