ED Raid : आप नेते आणि दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने सत्येंद्र जैन (ED raid on Satyendra Jain places ) यांच्या काही ठिकाणांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
ईडीने 7 ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये प्रकाश ज्वेलरकडून 2.23 कोटी रोख, वैभव जैनच्या परिसरातून 41.5 लाख रोख आणि 133 सोन्याची नाणी सापडली होती. ईडीला आणखी एक जवळचा मित्र जीएस मथारू यांच्याकडून 20 लाखांची रोकड मिळाली आहे.
ईडीने 30 मे रोजी सत्येंद्र जैन यांना अटक केली होती आणि सध्या ते 9 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. कोठडीतील चौकशीच्या आधारे, एजन्सीने सत्येंद्र जैन, त्यांची पत्नी पूनम जैन, अंकुश जैन, वैभव जैन, नवीन आणि सिद्धार्थ जैन यांच्या व्यतिरिक्त जीएस माथरू आणि योगेश जैन यांच्या घरावर छापे टाकले.
अंकुश, वैभव, नवीन, सिद्धार्थ जैन आणि योगेश जैन हे राम प्रकाश ज्वेलर्सचे संचालक आहेत. योगेश जैन हे अंकुश जैन यांचे सासरे आहेत. याशिवाय जीएस मथरू हे प्रुडेन्स स्कूल चालवणाऱ्या लाला शेर सिंग जीवन विज्ञान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अंकुशचे सासरे योगेश जैन हे देखील या ट्रस्टचे संचालक आहेत. ईडी आणि सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अंकुश जैन आणि वैभव हेही आरोपी आहेत.
वैभव जैन यांनी 27 फेब्रुवारी 2018 रोजी एजन्सीला दिलेल्या निवेदनात सांगितले की, सत्येंद्र जैन यांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक दाखवण्यासाठी पैसे दिले होते. तपासात राजेंद्र बन्सल, जीवेंद्र मिश्रा आणि सत्येंद्र जैन यांचे सीए जेपी मोहता यांनी सांगितले की, आधी हवालाद्वारे दिल्लीहून कोलकाता येथे पैसे पाठवले गेले आणि नंतर कमिशनच्या बदल्यात सत्येंद्र जैन यांच्या या चार अकिंचन डेव्हलपर्सनी कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केली.
सीबीआयने या प्रकरणी तपास केल्यानंतर 3 डिसेंबर 2018 रोजी सत्येंद्र जैन, त्यांची पत्नी पूनम जैन, अजित प्रसाद जैन, सुनील कुमार जैन, वैभव जैन आणि अंकुश जैन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय, ईडीने 31 मार्च 2022 रोजी सत्येंद्र जैन यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली होती.