मुंबई : एकीकडे पेट्रोल-डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, दैनंदिन उपयोग येणाऱ्या काडिपेटीच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. एक रुपयांत मिळणारी काडिपेटी आता 2 रुपयांना मिळणार आहे. नवीन किंमती डिसेंबरपासून लागू होतील. पाच प्रमुख माचिस उद्योगांच्या प्रतिनिधींनी सर्वसंमतीने हा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून नवीन किंमती लागू करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे.
वर्ष 2007 मध्ये काडिपेटीची किंमत 50 पैशांनी वाढली होती. गुरूवारी शिवकाशीमध्ये ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
किंमती वाढण्याची कारणे
काडिपेटी निर्मात्यांनी म्हटले की, माचिस बनवण्यासाठी 10 पेक्षा अधिक कच्च्या मालाची गरज असते. परंतु कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये सध्याच्या किंमतींमध्ये काडिपेटी विकने शक्य नाही. निर्मात्यांनी म्हटले आहे की, एक किलोग्राम लाल फॉस्फोरस 425 रुपयांनी वाढून 810 रुपयांवर पोहचला आहे.
मेण 58 रुपयांवरून 80 रुपये इतके झाले आहे. बाहेरील बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून 55 रुपये आणि मधील बॉक्स बोर्ड 32 रुपयांवरून 58 रुपयांवर पोहचला आहे. कागद, स्प्लिंट्सची किंमत, पोटॅशिएम क्लोरेट आणि सल्फरच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांनी अधिक वृद्धी झाली आहे. डीझेलच्या किंमती वाढल्यानेसुद्धा मॅन्युफॅक्चरींगवर अतिरिक्त बोझा वाढला आहे.
तामिलनाडुमध्ये माचिस उद्योग 4 लाख लोकांना रोजगार प्रदान करतो. यामध्ये बहुतांश महिला कर्मचारी असतात.