विमान कंपन्यांची ऑफर : रेल्वे तिकीट दरात विमान प्रवास शक्य

Airlines Offers: जर तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा. सणांचा हंगाम संपल्यानंतर विमान प्रवास रेल्वे प्रवासापेक्षा स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहे.  

Updated: Oct 15, 2021, 12:20 PM IST
 विमान कंपन्यांची ऑफर : रेल्वे तिकीट दरात विमान प्रवास शक्य

मुंबई : Airlines Offers: जर तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा. सणांचा हंगाम संपल्यानंतर विमान प्रवास रेल्वे प्रवासापेक्षा स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहे. रेल्वेच्या तिकीट दरात विमान प्रवास करता येणार आहे. तशी ऑफर विमान  (Air Plane Fares) कंपन्या देत आहेत. 

ट्रेनपेक्षा विमानाचे तिकीट स्वस्त 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली मार्गावर रेल्वेच्या सेकंड एसी कोचचे भाडे 3575 रुपये आहे. सणासुदीचा काळ संपल्यानंतर विमानाच्या प्रवासाचे भाडे 2463 रुपये प्रति प्रवासी असेल. मुंबई-बंगळुरु मार्गावरील रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या एसी कोचचे भाडे 1995 रुपये आहे. या मार्गावरील विमानांचे भाडे आधीच 2125 रुपयांपर्यंत कमी केले जाईल.

आगाऊ बुकिंग ऑफर्स 

दिल्ली-चंदीगड मार्गावरील रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या डब्याचे भाडे 2570 रुपये आहे. त्याचबरोबर एअर प्लेनचे भाडे 1283 रुपयांनी कमी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बहुतेक हवाई मार्ग रेल्वे तिकीटापेक्षा स्वस्त होणार आहेत. विमानाचे आगाऊ बुकिंग केल्यावर लोकांना रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवासाची ऑफर  (Air Plane Fares) मिळत आहे.

सणांचा हंगाम नवरात्री ते दिवाळीपर्यंत 

नवरात्र ते दिवाळीपर्यंत देशात सणांचा हंगाम असतो. या दरम्यान, लोकांमध्ये त्यांच्या घरी परतण्यासाठी चढाओढ असते. यामुळे बस, रेल्वे आणि विमानाची तिकिटे महाग होत आहेत. हा काळ संपल्यानंतर लोकांच्या हालचालींमध्ये अचानक घट होते. यावर मात करण्यासाठी विमान कंपन्या त्यांच्या तिकिटांच्या किंमती कमी करतात.