नवी दिल्ली : देशात corornavirus कोरोना व्हायरसचं संकट शमत नाही, तोच आणखीही काही संकटं डोकं वर काढत आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे एका नैसर्गिक संकटाची. हे संकट आहे चक्रीवादळाचं.
tamilnadu तामिळनाडूमध्ये निवार Cyclone Nivar या चक्रीवादळासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी सर्व किनारी भागांमध्ये एनडीआरएफची NDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार Cyclone Nivar बुधवारी कराईकल आणि मल्लापुरम या भागांवर धडकू शकतं. ज्या पार्श्वभूमीवर ताशी 100 ते 110 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
संबंधित भागांमध्ये तैनात असणाऱ्या पथकांनी सर्व जबाबदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चेन्नईच्या किनारपट्टी भागात अनेक चक्रीवादळं धडकली आहेत. त्यामुळं त्याच धर्तीवर येणाऱ्या Cyclone Nivar साठीही आपण सर्वतोपरी तयारी करत असल्याचंही ते म्हणाले.
पुढील चोवीस तास सावधगिरीचे...
बंगालच्या खाडी क्षेत्रावर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर हे Cyclone Nivar निवारमध्ये परिवर्तित झालेलं आहे. इतकंच नव्हे, तर आता ते भयावह स्वरुपही धारण करु शकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ बुधवारी तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे. परिणामी पुढील चोवीस तासांचा कालावधी हा अधिक सावधगिरीचा असेल.
बंगालच्या खाडी भागात तयार झालेलं हे वादळ तामिळनाडूच्या दिशेनं येत असून, सध्या ते पुदुच्चेरीपासून 410 किमी दक्षिणेकडे आहे.
#WATCH: Visuals from Gandhi Beach in Puducherry as strong winds hit the region, sea turns rough. #NivarCyclone is very likely to cross Tamil Nadu & Puducherry coasts between Karaikal & Mamallapuram on the evening of 25th November, as per IMD. pic.twitter.com/hFXEBlpOXA
— ANI (@ANI) November 24, 2020
(1) Deep Depression intensified into a Cyclonic Strom ―NIVAR‖ over southwest Bay of Bengal—(Cyclone Alert for Tamilnadu and Puducherry coasts- Yellow Message)
(2) Deep Depression weakened into a Depression over Gulf of Aden and adjoining Somaliahttps://t.co/QSfsJn8fMK pic.twitter.com/ydXZlvYmBz— India Meteorological Department (@Indiametdept) November 24, 2020
मुसळधार पावसाला सुरुवात ...
वादळाची एकंदर वाटचाल पाहता या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं चेम्बरमबक्कम आणि अशा अनेक जलाशयांवर प्रशासनांकडून नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय सावधगिरी म्हणून सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे. मासेमारांनाही समुद्रात नाव न नेण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
ENG
(96 ov) 364 (113 ov) 471
|
VS |
IND
00(0 ov) 465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.