अनंत अंबानी लवकरच अडकणार लग्नबंधनात, पाहा कोण आहे अंबानीची होणारी सून?

अंबानी यांच्या घरात आणखी एका नवीन व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती?

Updated: Jun 12, 2022, 07:02 PM IST
अनंत अंबानी लवकरच अडकणार लग्नबंधनात, पाहा कोण आहे अंबानीची होणारी सून? title=

मुंबई : राधिका मर्चंट हे नाव आता अनेकांसाठी नवं नाही. पण अनेकांना अजूनही राधिका मर्चंट कोण? (Who is Radhika Merchant) असा प्रश्न पडला असेल. राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. राधिका मर्चंट ही मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांची मंगेतर आहे. पण राधिका मर्चंट कोण आहे याबद्दल लोकांना अधिक उत्सुकता आहे. अंबानी कुटुंबाने तिला सून म्हणून निवडले आहे.

राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअरच्या सीईओची मुलगी

राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे, जे एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. तिच्या आईचे नाव शैला मर्चंट आणि धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे. राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईतच झाला होता. मात्र, ती मूळची गुजरातमधील कच्छची आहे. राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर राधिकाने बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केला. न्यूयॉर्क विद्यापीठातून तिने राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राधिका भारतात आली.

राधिकाने भारतात येताच एका आघाडीच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. राधिका आणि अनंत हे बालपणीचे मित्र असल्याचे सांगितले जाते. राधिकाला पुस्तके वाचणे, ट्रेकिंग आणि पोहायला आवडते. याशिवाय राधिकाला कॉफी प्यायलाही आवडते. राधिकाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते की ती अॅनिमल वेलफेअरसाठीही काम करते.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिका मर्चंटचा 'अरंगेत्रम' सोहळा अंबानी कुटुंबाने आयोजित केला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. या वर्षी जून महिन्यात श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांची एंगेजमेंट झाली, त्यावेळी शाहरुख खानने अनंतला विचारले की, तुझी गर्लफ्रेंड आहे का? त्यावेळी राधिका अनंतसोबत स्टेजवर उभी होती. यावेळी शाहरुखने अनंतचा फोनही तपासला होता, जेणेकरून त्यामध्ये राधिकाचा नंबर असल्याची खात्री होईल. शाहरुख अनंतला चिडवत होता आणि त्याला राधिकाचे नाव तोंडातून काढून घ्यायचे होते. अनंतने राधिकाचे नाव घेतले नसले तरी राधिका त्याच्यासाठी खूप खास असल्याचे त्याने निश्चितपणे स्पष्ट केले होते.