नवी दिल्ली : विज्ञान भवनमध्ये शनिवारी झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत सामन्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय पाहायला मिळाला. या बैठकीत एकूण 33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. यातील 7 वस्तूंना 28 ते 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणले गेले आहे. इतर वस्तूंचा जीएसटी दर 18 टक्केहून 12 टक्क्यांपर्यंत आणला गेला आहे. 28 टक्के जीएसटीच्या स्लॅबमध्ये केवळ 28 वस्तू आहेत. हे कमी झालेले दर 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहेत.
#WATCH FM Arun Jaitley briefs the media post GST Council meeting https://t.co/RMrPxZmi4R
— ANI (@ANI) December 22, 2018
सिमेंट, ऑटो पार्ट्स, टायर, एसी आणि टीव्ही वर 18 टक्के जीएसटी
धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या विमान प्रवासावरील जीएसटीत घट
दिव्यांगाच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 28 टक्के ऐवजी 5 टक्के जीएसटी लागणार
100 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या तिकीटांवर 18 टक्के जीएसटी
शनिवारी सकाळी विज्ञान भवनमध्ये जीएसटी काऊंसिलची 31 वी बैठक अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 1200 हून अधिक वस्तू आणि सेवांमधील 99 टक्क्के वस्तू आणि सेवांवर 18 किंवा त्यापेक्षा कमी जीएसटी लागले असे पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सर्वसामान्य नागरिकांवरील कराचा बोजा कमी करण्यावर जीएसटी काऊंसिलचे लक्ष होते.
याआधी दोन वर्षांत 30 वेळा झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत एकूण 979 निर्णय घेण्यात आले. जीएसटी परिषदेत राज्यातील अर्थ मंत्री आणि केंद्रीय मंत्री सहभागी होतात. 15 सप्टेंबर 2016 ला जीएसटी परिषद निर्माण झाली होती.