जोधपूर : राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर(Jodhpur) तुरुंगात बलात्काराचा आरोपी आसाराम बापू (Asaram Bapu) याला आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले आहे. आसारामला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावू लागल्याने तुरूंग प्रशासनाने आसारामला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
आसाराम बापूला जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आसरम बापूने यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू जोधपूर तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. 15 ऑगस्ट 2013 ला आसारामने जोधपूरजवळील मनाई भागात एका अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचे बळी बनविले होते.
बुधवारी राजस्थानमध्ये कोरोनाचे 16,815 नवीन रुग्ण आढळले. तर व्हायरसमुळे 155 रुग्ण दगावले. राजस्थानमध्ये सध्या कोरोनाच्या 1,96,683 एक्टीव्ह केसेस आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 5,021 संक्रमित लोकांनी प्राण गमावले असल्याची माहीती आरोग्य मंत्रालयाने दिली.