बागपत : महाभारतातील पांडवांच्या ‘लाक्षागृह’मध्ये थांबण्याचे, तिथे दुर्योधन आणि शकुनी मामांच्या षडयंत्राने त्यांना मारण्याच्या बाबतीत सर्वांनाच माहिती आहे. या ‘लाक्षागृह’च्या गुपितावरून आता पडदा उठणार आहे.
कारण या गुहेचे खोदकाम करण्याची परवानगी पुरातत्व विभागाने आली आहे. स्थानिक लोकांमध्ये मान्यत आहे की, ‘लाक्षागृह’ची पुरावे बागपतच्या बरवाना क्षेत्रात मिळतात. याच आधारावर स्थानिक इतिहासकार या ऎतिहासिक स्थळाचे खोदकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करत होते.
महाभारतात ‘लाक्षागृह’ची महत्वपूर्ण भूमिका मानली जाते. कौरवांनी ही गुहा तयार केली होती आणि यात पांडवांना जिवंत जाळण्याचं षडयंत्र केलं होतं. पण पांडवांनी झुप्या रस्त्याच्या माध्यमातून जीव वाचवला होता. द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या स्थळाचे ऎतिहासिक पुरावे बागपतच्या बरवाना क्षेत्रात मिळतात. बरनावाचं जुनं नाव वर्णाव्रत असे मानले जाते. असेही मानले जाते की, पांडवांनी कौरवांना जी पाच गावे मागितली होती त्यातील एक गाव हे आहे.
एएसआय अधिका-यांनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथे खोदकाम सुरू केलं जाईल आणि पुढील तीन महिने ते सुरू राहिल. पुरातत्व विभागासोबतच इन्स्टीट्यूट ऑफ आर्किओलॉजीचे विद्यार्थी सुद्धा या खोदकामात मदत करतील. आश्चर्याची बाब म्हणजे ही जागा ऎतिहासिक चंदयान आणि सिनोली स्थळाजवळ आहे. २००५ मध्ये सिनोलीच्या खोदकामातून हडप्पा काळातील स्मशानभूमीचे पुरावे मिळाले होते. तर चंदयान गावातून तांब्याचा क्राऊन मिळाला होता.