सरकारी कर्मचाऱ्यांनो वृद्ध पालकांना सांभाळा, अन्यथा वेतनकपातीला तयार रहा..!

आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार कापणार, आसाम राज्य सरकारचा अभिनव निर्णय, कापलेली रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे.

Updated: Jul 30, 2018, 12:47 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांनो वृद्ध पालकांना सांभाळा, अन्यथा वेतनकपातीला तयार रहा..! title=

नवी दिल्ली: आसाम राज्य सरकारनं एक अभिनव निर्णय घेतलाय. एखाद्या विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्यानं आपल्या पालकांची चांगली काळजी घेतली नसेल तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही रक्कम संबंधित पालकांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. पालकांची काळजी घ्यावी लागणारी काही भावंडे असतील तर वेतनकपात १५ टक्क्यांपर्यंत होऊ शकते. असं, आसामचे मंत्री एच. बी. शर्मा यांनी स्पष्ट केलंय. २ ऑक्टोबर पासून हा निर्णय लागू होणार आहे.

आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार कापणार, आसाम राज्य सरकारचा अभिनव निर्णय, कापलेली रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे.