तुम्ही पण Axis bank चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!

Axis bank : खाजगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एका वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे.

Updated: Oct 19, 2022, 12:01 PM IST
तुम्ही पण Axis bank चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!  title=

Axis Bank : देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) सीमांत खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढीव व्याजदर तात्काळ लागू करण्यात आला आहे. देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता.

रेपो दरवाढीनंतर व्याजदरात वाढ 

वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्जाचे दर एका वर्षाच्या MCLR च्या आधारावर ठरवले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 30 सप्टेंबर रोजी रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर अॅक्सिस बँकेने MCLR दर वाढवला आहे. एक दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील MCLR देखील 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15-8.30 टक्के करण्यात आला आहे.

वाचा : टीम इंडिया आज न्यूझीलंडशी भिडणार, पण तुम्ही कुठे पाहणार हा सामना, जाणून घ्या

या बँकांनी व्याजदरही वाढवले

MCLR दोन वर्षांसाठी 8.45 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.50 टक्के असेल. अॅक्सिस बँकेने सांगितले की, हे दर पुढील पुनरावलोकनापर्यंत वैध असतील. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने MCLR दरात वाढ केली होती. याशिवाय SBI ने मंगळवारी मोठी रक्कम जमा करणाऱ्यांसाठी व्याजदरात 0.3 टक्क्यांनी वाढ केली आहे.

एसबीआयने (sbi) सोमवारी 10 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या बचत खात्यांवरील व्याज 0.50 टक्क्यांनी कमी करून 2.70 टक्के केले. एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, आता ग्राहकांना 10 कोटी किंवा त्याहून अधिक ठेवींवर 3 टक्के दराने व्याज मिळेल.