राम मंदिर भूमीपूजनावेळी पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर दिसलेले 'ते' महंत कोरोना पॉझिटीव्ह

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी .... 

Updated: Aug 13, 2020, 01:47 PM IST
राम मंदिर भूमीपूजनावेळी पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर दिसलेले 'ते' महंत कोरोना पॉझिटीव्ह
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिरात्या बहुप्रतिक्षित भूमीपूजनानंतर साधारण आठवड्याभराचा कालावधी लोटला आणि राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य महंत नृत्य गोपाळ दास यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गुरुवारी महंत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महंतसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. याव्यतिरिक्त व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांचीही या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. 

उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मथुरा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येण्याची विचारणा उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

'माननीय मुख्यमंत्र्यांनी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या महंत नृत्य गोपाळ दास यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांनी महंतांचे अनुयायी आणि मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशीची चर्चा केली आहे', असं सरकारच्या पत्रकात म्हणण्यात आलं असून, त्यांना तातडीनं शक्य त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात याबाबचे आदेश दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दास यांच्या तापावर नियंत्रण मिळवलं आहे. पण, त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे.  त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या चिंता करण्याचं कारण नाही. महंतांची एँटीजन टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये ते कोविड पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. ज्यानंतर त्यांना मेदांतामध्ये दाखल करण्यात आलं. 

केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दास यांच्यावर सोपवण्यात आली होती.