Bank Holidays in August 2021 : उद्यापासून 5 दिवस बँका राहणार बंद

5 दिवसांची सुट्टी असल्यामुळे लवकर कामे हुरकून घ्या 

Updated: Aug 18, 2021, 11:59 AM IST
Bank Holidays in August 2021 : उद्यापासून 5 दिवस बँका राहणार बंद title=

मुंबई : ऑगस्ट महिन्यात बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. यामुळे आताच बँकांची महत्वाची काम हुरकून घ्या. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत. बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त काही सुट्ट्या असतात.

ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्ट्या होत्या. मोहरमच्या निमित्ताने नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ आणि इतर अनेक राज्यांमध्ये 19 ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. पहिली ओणम साजरी करण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका 20 ऑगस्टला बंद राहतील. तिरुवनंतपुरम आणि कोचीसाठी 21 ऑगस्टला तिरुवोनमसाठी बँका बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद असतात.

या दिवशी बँका राहणार बंद 

19 ऑगस्ट 2021 – मोहरम (आशुरा) 
20 ऑगस्ट 2021 – मोहरम / पहिला ओणम 
21 ऑगस्ट 2021 – तिरुवोनम
22 ऑगस्ट 2021 – देशभरातील सर्व बँका रविवारमुळे बंद राहतील.
23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती
28 ऑगस्ट, 2021 – चौथा शनिवार 
29 ऑगस्ट 2021 – रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी
31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमी

रिझर्व्ह बँक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकांसाठी सुट्ट्यांची यादी करते जारी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 25 डिसेंबर ख्रिसमस या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. दिवाळी, दसरा, ईद अशा प्रसंगी अनेक ठिकाणी बँकाही बंद असतात. असेही काही सण आहेत, जेव्हा काही राज्यांच्या बँका बंद राहतात. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकांसाठी सुट्ट्यांची यादी जारी करते.