बारामुल्लात चकमक, जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद

ठार झालेल्या दहशतवाद्याजवळ मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारूगोळा सापडला

Updated: Aug 21, 2019, 08:49 AM IST
बारामुल्लात चकमक, जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची बातमी मिळतेय. ठार झालेल्या दहशतवाद्याजवळ मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारूगोळा सापडला. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) बिलाल शहीद झाल्याची बातमी मिळतेय. दहशतवाद्यांकडून लपून-छपून गोळीबार सुरू होता. ही चकमक मंगळवारी रात्रीपासून सुरू होती. आता ही चकमक संपुष्टात आलीय.

उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर सीमेपलिकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळताना दिसतंय.