उपवास सुरु होण्याआधी काँग्रेस नेत्यांनी छोले भटुऱ्यावर मारला ताव

काँग्रेस नेत्यांचा फोटो व्हायरल

shailesh musale Updated: Apr 9, 2018, 03:55 PM IST
उपवास सुरु होण्याआधी काँग्रेस नेत्यांनी छोले भटुऱ्यावर मारला ताव title=

नवी दिल्ली : दलितांच्या हिंसेविरोधात काँग्रेसने सोमवारी देशव्यापी उपवास ठेवला आहे. याचा भाग बनण्य़ासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते राजघाटला पोहोचले. पण याआधी एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीतील चांदनी चौक येथील एका हॉटेलमध्ये जेवनावर ताव मारतांना दिसले. फोटोमध्ये अरविंदर सिंह लवली, हारून यूसुफ आणि अजय माकन देखील दिसत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते त्यांचा बचाव करतांना दिसले आहे.

फोटोमध्ये काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली देखील आहेत. जेव्हा त्यांना या फोटोबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, हा कोणताही अनिश्चित उपवास नाही आहे. तर 10:30 ते 4:30 पर्यंतचा एक सांकेतिक उपवास आहे. फोटो सकाळी 8 वाजल्याचा आहे. भाजप सरकार चालवण्याऐवजी आम्ही काय खातोय याकडे लक्ष देतंय अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

भाजप नेते गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं की, काँग्रेसच्या तर उपवासामध्ये ही घपला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी राजघाटावर पक्षाचे नेते जगदीश टाइटलर आणि सज्जन कुमार देखील पोहोचले होते पण त्यांना मंचावरुन खाली उतरवलं गेलं. सज्जन कुमार आणि जगदीश टाइटलर 1984 सिख दंगल प्रकरणी आरोपी आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत जर ते बसले असते तर यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता त्यामुळे त्यांना मंचावरुन खाली उतरवलं गेलं. पण काँग्रेस नेत्यांनी हे नाकारलं आहे.