बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला तब्यत घेतले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ताफा बख्तियारपूर मार्केटमधून जात होता. यावेळी त्यांना भेटण्यासाठी येथील नागरिकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली होती.
नितीश कुमार यांनी ही गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबविली आणि ते नागरिकांना भेटू लागले. त्यांनतर नितीश कुमार येथील रॅलीला मागर्दर्शन करण्यास निघाले.
यावेळी ते व्यासपीठावर आले असता पाठीमागून एका अज्ञात युवकाने त्यांच्या पाठीवर बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच ते बाजूला झाल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला लगेच ताब्यात घेतले.
नितीश कुमार यांच्यावरील या हल्ल्याचे कारण कळले नसून पोलीस त्या तरुणाची चौकशी करत आहेत.