बिहारमध्ये बीजेपी-जेडीयू-एलजेपी एकत्र लढणार, जेपी नड्डा यांची घोषणा

 बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

Updated: Aug 23, 2020, 02:32 PM IST
बिहारमध्ये बीजेपी-जेडीयू-एलजेपी एकत्र लढणार, जेपी नड्डा यांची घोषणा title=

पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. बिहार भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भाग घेतला. बिहार, जेडीयू आणि एलजेपी बिहार निवडणुकीत एकत्र लढतील, असेही जेपी नड्डा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बिहार विधानसभेची निवडणूक नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढविली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

बिहार प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, 'आम्ही तिघेही (भाजप, जेडीयू, एलजेपी) एकत्र लढून निवडणूक जिंकू. भाजपबरोबरच एनडीएचे मित्रपक्ष जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षानेही निवडणूक जिंकली पाहिजे.'

विरोधकांवर टीका करताना जे.पी. नड्डा म्हणाले की, 'बिहार आणि देशातला विरोध पूर्णपणे संपुष्टात आला आहे. विरोधी पक्ष केवळ पोकळ राजकारण करतो. तसेच जे.पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना छोट्या सभा घेण्याची व डोर-टू-डोर प्रचार करण्याची विनंती केली. सर्वात प्रभावी मोहीम घराघरात जाईल. भाजप आणि नितीशकुमार यांच्यामार्फत करण्यात आलेली कामे बिहारमधील जनतेपर्यंत पोहोचवावी लागतील.'

जे.पी नड्डा म्हणाले की, 'बिहारमध्ये लॉकडाऊन आहे. पण 6 सप्टेंबरनंतर ते निश्चितपणे बिहारला जातील. भाजपला आपल्या मित्रपक्षांना ही विजयी करावं लागेल. भाजपला आपल्या मित्रपक्षांना सामर्थ्य व शक्ती द्यावी लागेल. कोरोना संक्रमण काळात निवडणुका होणार आहेत आणि हे एक मोठे आव्हान आहे.'

जे.पी नड्डा पुढे म्हणाले की, 'आपल्याकडे साथीचे रोग, पूर आणि निवडणुका यांचे आव्हान आहे. संपूर्ण देशात दहा लाखावर कोरोना संक्रमितांची संख्या गेली आहे. रिकव्हरी रेट देशात 74 टक्के आहे. त्याचवेळी बिहारमधील रिक्व्हरी रेट 73 टक्क्यांहून अधिक आहे. यासाठी आरोग्यमंत्री मंगल पांडे अभिनंदनास पात्र आहेत. महामारी आणि पूर संकटात बिहारने चांगले काम केले. भाजप हा एकमेव पक्ष आहे जो साथीच्या काळातही जनतेशी जोडलेला आहे.'

कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना बिहार भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनीही आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा दिला. भूपेंद्र यादव म्हणाले की, 'भाजप आहे तयार, आत्मनिर्भर बिहार' या घोषणेसह भाजप यावेळी बिहार विधानसभा निवडणूक लढवेल.