Blue Snake Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या वन्यप्राणी आणि सापांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. सापांच्या जीवनशैलीबाबत कायमच उत्सुकता असते. त्यामुळे सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एका सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारा साप काळा, पिवळा नसून चक्क निळा दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी या सापाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी खरंच हा निळा रंगाचा साप आहे की, फिल्टर वापरलं आहे? याबाबत शंका उपस्थित केली आहे. व्हिडीओत दिसणारा निळा साप खरा की खोटा? याबाबत माहिती नाही. पण सोशल मीडियावर या सापाची जोरदार चर्चा रंगली आहे.
स्नेक वर्ल्ड नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एक जण सापाला डिवचताना दिसत आहे. खरं तर हा साप खरंच निळा आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. एडिटिंग सेन्स असलेल्या बहुतांश लोकांनी निळा फिल्टर वापरला असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. काहीही असो, पण या निळ्या रंगाच्या सापाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.