Crime News : अनेकवेळा लग्नात दागिन्यांच्या चोरीच्या किंवा पाकिटमारीच्या घटना पाहिल्या असतील. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्याने अख्खा तालुका हादरला आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल अशा प्रकारे नवऱ्या मुलाला गंडा घालण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कुलपहार इथल्या नौगाव इथं राहणाऱ्या मुरलीलाल यांचा मुलगा मदनसाठी ते मुलगी शोधत होते. मुलासाठी ते अनेक मुली पाहत होते यादरम्यान त्यांची एका व्यक्तीसोबत ओळख होते त्याने मुरलीलाल यांना भरतकुपला गावामध्ये बोलावलं. एक परिवारमधील दोन मुला दाखवल्या पण पुढे काही झालं नाही. संबंधित व्यक्तीने दुसऱ्याच दिवशी आणखी 2 मुली पाहण्यासाठी बोलावून घेतलं, यावेळी मदनने 24 वर्षाची एक मुलगी पसंत केली.
मुलगी पसंत झाल्यावर मुरलीलाल यांनी पुढच्याच महिन्यामध्ये लग्न करू सांगितलं. मात्र ज्याने हे स्थळ दाखवलं त्याने त्याचदिवशी लग्न करण्याची अट ठेवली, मदनलालनेही ते मंजुर केलं. ठरल्याप्रमाणे सर्व विधिवत लग्न पार पाडलं. मुलगी गरीब आहे म्हणून मदनलालकडून 50 हजार रूपयेसुद्धा घेतले.
लग्न झाल्यावर जेव्हा नवरीला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा नवरीची धाकटी बहिण आणि काका सोबत वराच्या घरी आले. घरी जात असताना मध्येच वधूच्या बहिणीने कपडे घेण्यासाठी गाडी थांबवली. बारकी बहिण गेली लवकरत आलीच नाही म्हणून स्वत: नवरी पाहायला जाते पण तीसुद्धा येत नाही. त्यापाठोपाठ त्यांचा काकाही जातो.
बराच वेळ होतो तिघेही काही येत नाहीत शेवटी नवऱ्याच्या घरच्यांच्या लक्षात येतं की त्यांची फसवणुक झाली आहे. त्यानंतर ते थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशमधील कुलपहारमधील इथली घटना आहे.