लग्नाच्या दिवशी बुलेट घेऊन निघाली वधू, व्हीडीओ पाहून बुलेट राणीवर झाले फिदा!

 तुम्ही कधी वधूला बुलेट चालवताना पाहिलं आहे का? 

Updated: Aug 16, 2022, 07:15 PM IST
लग्नाच्या दिवशी बुलेट घेऊन निघाली वधू, व्हीडीओ पाहून बुलेट राणीवर झाले फिदा! title=

Bride viral Video :  सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्न सराईमध्ये वधू-वरांच्या रोज अनेक नवनवीन स्टाइल समोर येत असतात. कधी अनोखा डान्स तर कधी वधू-वरांची मारामारी, पण तुम्ही कधी वधूला बुलेट चालवताना पाहिलं आहे का? 

प्रेमविवाह ठरल्याचा आनंद सर्वांनाच असतो, प्रत्येकजण आपलं प्रेम पूर्ण झालं की तो आपला आनंद व्यक्त करण्यासाठी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ती लग्नाचा पोशाख परिधान करून बुलेटमध्ये फिरायला गेली. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने खूप धुमाकूळ घातला आहे. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही नववधू लग्नाचा लेहेंगा परिधान केलेल्या स्वॅगमध्ये कशी बुलेट चालवत आहे.  ती पूर्णपणे लग्नाच्या मेकअपमध्ये दिसत आहे. मात्र वधूच्या या स्टाईलवर वऱ्हाडीही फिदा झालेले पाहायला मिळाले.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वधू स्वॅगसह बुलेट चालवतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर  'जेव्हा तुमचे कुटुंब प्रेमविवाहासाठी तयार असेल' असं कॅप्शनही लिहिलं आहे. जो witty_wedding नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.