लाकडांच्या दोन ओंडक्यांवरून खोल दरी पार; कार चालकांच्या कौशल्याने सर्वच आवाक्..

Driving Skills Video: व्हिडीओमध्ये एक कार चालक हुशारीने कार दोन लाकडांच्या ओंडक्यांवरून खोल दरी पार करतो. हा व्हिडीओ जगभरात प्रसिद्ध होत आहे.

Updated: Mar 31, 2022, 03:10 PM IST
लाकडांच्या दोन ओंडक्यांवरून खोल दरी पार; कार चालकांच्या कौशल्याने सर्वच आवाक्.. title=

Driving Skills Video: तुम्ही तुमच्या आजूबाजूला अफाट कौशल्य असलेले कार ड्रायव्हर पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका कार ड्रायव्हरचा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो अशक्य गोष्ट शक्य वाटणारी गोष्ट शक्य करीत आहे. या व्हिडीओ पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही. यापूर्वी तुम्ही असा व्हिडीओ पाहिला नसवा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कार चालक दोन लाकडांच्या ओंडक्यांवरून अतिशय काटेकोरपणे कार पुढे नेतो. लाकडांच्या ओंडक्यावरून कारने खोल दरी ओलांडतो. हा व्हिडिओ आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयनका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

 व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, 'जीवनाच्या प्रत्येक मार्गावर एक पूल असतो. त्या पूलाला पार करण्यासाठीचे कौशल्य तुमच्याकडे असतील तर, घाबरण्याची गरज नाही. आत्मविश्वासाने पुढे जा..

अशक्य वाटणाऱ्या आव्हानावर मात करत कार चालकाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.