दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

24 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यानच्या काळात सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या

Updated: Jul 4, 2022, 08:13 AM IST
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

CBSE Result cbseresults.nic.in: सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं चीज होणार आहे. अर्थात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच निकालासंबंधीची माहिती समोर आली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुल्यांकलनाचं काम पूर्णत्वास आलं असून, याच महिन्यात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर कुठे पाहता येणार निकाल? 
cbseresults.nic.in
results.gov.in
digilocker.gov.in
DigiLocker app
UMANG App

24 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यानच्या काळात सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे सीबीएसईच्या टर्म 1 आणि टर्म 2 च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना एकच संयुक्त गुणपत्रिका मिळणार आहे. 

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झालेली असतानाच इयत्ता बारावीचे निकालही लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कसा पाहता येईल निकाल? 
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
- तिथे होमपेजवर तुम्हाला दहावी, बारावीच्या टर्म 2 निकालांची लिंक दिसेल. 
- इथे जाऊन आपल्या इयत्तेला निवडा आणि लॉगईन करा.
- आवश्यक ती माहिती दिल्यानंतर तुमच्यासमोर निकाल दिसेल, तो पाहा आणि त्याची प्रतही सोबत बाळगा.