नवलंच! बारावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना समान गुण

या जुळ्या बहिणी केवळ सारख्याचं दिसत नाहीत तर या दोघींनी 12वी परीक्षेत अगदी समान टक्के मिळवले आहेत.

Updated: Jul 14, 2020, 11:31 PM IST
नवलंच! बारावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना समान गुण title=

नवी दिल्ली : नोएडातील Noida मानसी आणि मान्या या जुळ्या बहिणींनी सीबीएसई CBSE बारावी परीक्षेत एकसारखे गुण मिळवले आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे या दोघींना सर्व विषयातही समान गुण मिळाले आहेत.

मानसी आणि मान्या या जुळ्या बहिणी केवळ सारख्याचं दिसत नाहीत तर या दोघींनी 12वी परीक्षेत अगदी समान 95.8 टक्के मिळवले आहेत. दोघींना सर्व विषयात एक सारखेच गुण मिळाले आहेत. आता या दोघी बहिणी इंजिनियरिंगसाठीची पुढील तयारी करत आहेत. जेईई परीक्षेसाठी दोघींनी तयारी सुरु केली आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे ही परीक्षा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

12वी परीक्षेत दोघी बहिणींनाही चांगले गुण मिळतील याचा विश्वास होता, परंतु दोघींना अगदी सारखेच, समान गुण मिळतील याची कल्पना नसल्याचं, त्यांनी सांगितलं.

'आम्ही अगदी सारख्या दिसत असल्यामुळे प्रत्येक जण आम्हाला ओळखतो. आम्हा दोघींमध्ये केवळ नावाचीचं भिन्नता आहे. आम्ही दोघींही आम्हाला चांगले गुण मिळतील याबाबत आश्वस्त होतो, पण गुण इतके सारखे येतील याची कधी कल्पनाही केली नसल्याचं', मानसीने सांगितलं.

'दोन वर्षांपूर्वी मी वाचलं होतं की, सारख्या दिसणाऱ्या दोन जुळ्या बहिणींनी सारखेच गुण मिळवले होते. पण तेव्हा मला हा योगायोग वाटला होता. आता मला विश्वासच बसत नाही की, आम्हा दोघींना सारखेच गुण मिळाले आहेत. आमच्यात नेहमीच स्पर्धा असते. पण आम्हाला यापूर्वी कधीही समान गुण मिळाले नसल्याचं' मान्याने सांगितलं.

ग्रेटर नोएडातील ऑस्टर पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या मानसी आणि मान्या या जुळ्या बहिणींना इंग्रजी आणि कंम्प्युटर सायन्समध्ये 98-98 गुण मिळाले आहेत. तर रसायन आणि शारीरिक शिक्षणात 95-95 गुण मिळाले आहेत.

मानसी आणि मान्याच्या जन्म वेळेत केवळ नऊ मिनिटांचं अंतर आहे. दोघींनाही वेग-वेगळं खाण्याचा आणि बॅडमिंटन खेळण्याचा छंद आहे.

आधार कार्ड हरवल्यास असं डाऊनलोड करा e- Aadhaar