नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. हा निकाल 83.4 टक्के लागला असून यातही मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या साईट्सवर तुम्हाला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात आली होती. 10 वी आणि 12 वीच्या एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती.
गेल्यावर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल हा 29 मे 2018 ला जाहीर झाला होता. तर 12 वीचा निकाल 26 मे 2018 ला जाहीर करण्यात आला होता. गेल्यावर्षी 10वी परिक्षेत 86.70 टक्के तर 12 वीत 83.01 टक्के विद्यार्थी पास झाले होते.