विजय माल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

कर्जबुडव्या फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं आज पहिलं आरोपपत्र दाखल केलं. किंगफिशर एअरलाईन्सनं IDBI बँकेचं 900 कोटी बुडवल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 

Updated: Jun 14, 2017, 11:23 PM IST
विजय माल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल title=

मुंबई : कर्जबुडव्या फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं आज पहिलं आरोपपत्र दाखल केलं. किंगफिशर एअरलाईन्सनं IDBI बँकेचं 900 कोटी बुडवल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

या 57 पानी आरोपपत्रात आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्याच्या अनेक कलमांचा समावेश करण्यात आलाय. विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं असून त्यावर आता लवकरच सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान विजय माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या वेबमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. माल्ल्या यांचा पुत्र सिद्धार्थ मल्ल्या हा देखील यावेळी कोर्टात उपस्थित होता. आपण कोणत्याही कोर्टाचा अवमान करून पळून आलेलो नाही, असं सांगत मल्ल्या यांनी आपणावरील सर्व आरोप यावेळी फेटाळून लावले. ओवल क्रिकेट मैदानावर भारतीय प्रेक्षकांनी आपणावर चोर अशी शेरेबाजी केल्याचाही त्यांनी यावेळी इन्कार केला.